कानडा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची दांडी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : विविध कार्यालयातील कर्मचारी आपल्या कार्यालयाला दांडी मारताना आपण बघितले वाचले आहेत. परंतु शाळेचे शिक्षक दांडी मारताना आपल्या फार कमी निदर्शनास येते. मात्र मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कानडा येथील शिक्षकांनी आज कोणालाही न कळवता चक्क शाळेला दांडी मारल्याचा हा धक्कादायक प्रकार येथील जि प शाळेत उघडकीस आला आहे.

मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद कानडा शाळांमधील आज सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाले. मात्र,रोज शिक्षक वर्ग हजर राहणारे आज एकही हजर नसल्याची बातमी सरपंच सुषमा रुपेश ढोके यांना समजली. दरम्यान, विद्यार्थी शाळा बाहेर फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली असता त्यांनी स्वतः शाळेला जाऊन भेट दिली. यावेळी एकही शिक्षक शाळेत असल्याचे निदर्शनास आले नसून याबाबत पंचायत समिती कार्यालयाला त्यांनी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे सरपंचांनी 'सह्याद्री चौफेर' बोलताना सांगितले. त्यानंतर पार्डी येथील एक शिक्षक निते सर म्हणून हे दुपारी 12.40 ला कानडा शाळेत दाखल झाले. मात्र, गैरहजर राहणाऱ्या व मर्जीने शाळेत हजर होणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी यासाठी सरपंच सौ सुषमा ढोके यांनी शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षाना अवगत करित आज शिक्षक गैरहजर असल्याचा अहवाल तयार केला असल्याची माहिती आहे.

तालुक्यात शैक्षणिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शिक्षकच गैरहजर राहत असेल तर शिक्षण विभागाची यंत्रणा किती जागृत आहेत, अशी खंत महिला सरपंच ढोके यांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याकडून त्यांच्या वर कारवाईचा बडगा जरी उगारला जात असला, तरी विद्यार्थ्यांना असे वाऱ्यावर सोडणाऱ्या यंत्रणा काय करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येथील कर्तव्यदक्ष सरपंचा सौ सुषमा ढोके यांनी एक ते चार पर्यंत वर्ग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात तूर्तास खंड पडू नये म्हणून स्वतः सावित्रीबाईची भूमिका निभावत विद्यार्थ्यांचा 'क्लास' घेतल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.


माझे कार्य अभिनंदनीय जरी आले तरी शाळेवर शिक्षक गैरहजर राहणे हे मला कदापि न पटणारे आहे. त्यांच्या वर कारवाई कडक व्हावी या मताची मी असून, संबंधित विभागाने तत्काळ पुढील पाऊल उचलावे.

- सुषमा रुपेश ढोके 
सरपंच ग्रामपंचायत कानडा, पं. स. मारेगाव 
कानडा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची दांडी कानडा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची दांडी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 03, 2023 Rating: 5
Powered by Blogger.