आज मारेगाव येथे ओबीसी सभेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कुणबी जात प्रमाणपत्र हे मराठा समाजाला देण्याचा निर्णय सरकारने घातला आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी ओबीसी महामोर्चाचे नियोजनाकरिता आज दि.5 नोव्हेंबर ला दुपारी 12 वाजता येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती च्या हॉल मध्ये सभा आयोजित करण्यात आली. या होणाऱ्या सभेला मारेगाव तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील सध्याची ओबीसी ची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशातच राज्य सरकारने नुकताच घेतलेला निर्णय ओबीसी समाजासाठी आज आणि उद्याच्या भविष्यासाठी अडसर ठरणार आहे. त्यामुळे ओबीसी बांधवानी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे आणि आरक्षण बचाव करण्याची हीच ती वेळ आलेली आहे. असे समितीकडून सांगण्यात येत आहे. सरकार च्या त्या निर्णयाविरोधात संपूर्ण ताकदनिशी महाराष्ट्रात कधी झाला नाही एवढा लढा "ओबीसी महामोर्चा" यवतमाळ जिल्ह्यात झाला पाहिजे, त्या करिता सर्वांनी आपापला पक्ष तूर्तास बाजूला ठेवत, सभेला एकत्रित उपस्थिती दर्शवावी. असे देखील आवाहन ओबीसी कृती समन्वय समिती, मारेगाव च्या वतीने केले आहे.

या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी श्री. प्रदीप वादाफळे, श्री. शैलेश गुल्हाने, श्री. महाडोळे, श्री. तीखे साहेब, फेंडर सर, श्री.राजू देशमुख, श्री. रमेश ठाकरे, ॲड. राजेन्द्र महाडुळे, श्री. खरोडे सर, श्री.राजाभाऊ पोटे, श्री. साहेबराव जूनघरे, श्री.सतीश भोयर हे सर्व यवतमाळ ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समिती च्या वतीने देण्यात आली आहे. 
आज मारेगाव येथे ओबीसी सभेचे आयोजन  आज मारेगाव येथे ओबीसी सभेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on November 04, 2023 Rating: 5
Powered by Blogger.