वचननामा: स्वतंत्र भारताच्या लोकशाही राजास अर्थात मतदारास विनम्र अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी म्हैसदोडका ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा, गावातील नागरिकांच्या समग्र विकासासाठी मी सौ ललिता मारोती तुराणकर आपल्या शतशः आशिर्वादाने "सरपंच" पदाकरिता उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील मानवी हक्कावर आधारित विकास प्रक्रिया राबविण्यात मी कटिबद्ध राहणार आहे. गाव विकासाचा दूरदृष्टीने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत प्रशासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी तथा गावातील नागरिकांच्या सुयोग्य मदतीने आराखडा करावयाचे असल्याची प्रामाणिक व सुबक कल्पना कृतीत उतरवून गाव सर्वांगसुंदर घडविण्याचा माझा मानस आहे.

गाव पातळीवरील पायाभूत सुविधांचा विकास त्यात प्रामुख्याने नागरिकांची मूलभूत गरज असलेल्या वीज पाणी, आरोग्य, शिक्षण, वाचनालय, युवकांकरिता क्रिडांगण, रस्ते, नाली सह विविधांगी उपाय योजनेवर मी व माझी टीम भर देऊन सदैव प्रामाणिक प्रयत्न असेल.

ग्राम पातळीवर पक्ष, गट तटाला बगल देवून सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक उपाययोजना आपल्या सहकार्याने व आशिर्वादाने विकासाभिमुख योजना राबविण्यासाठी आणि त्याचा अमल करण्यासाठी हा माझा नियोजित वचननामा...!

मायबाप, भाऊ, ताई आपले अमूल्य मत गाव पातळीवरील विकासाचा वाटा पदरी पाडण्यासाठी मी ललिता मारोती तुरणकर बोध चिन्ह कपबशी या पहिल्या क्रमांकाच्या बोधचिन्हा समोरील बटण दाबून मला व माझ्या संपूर्ण टीम ला आशीर्वाद द्यावा व गाव विकासाचे शिलेदार व्हावे हेच आशिर्वादरुपी मागणं आहे.

उमेदवार - सौ. ललिता मारोती तुरणकर, म्हैसदोडका 
वचननामा: स्वतंत्र भारताच्या लोकशाही राजास अर्थात मतदारास विनम्र अभिवादन वचननामा: स्वतंत्र भारताच्या लोकशाही राजास अर्थात मतदारास विनम्र अभिवादन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.