शॉट सर्किट मुळे जुन्या घराला लागली आग, नवरगाव येथील घटना


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथील जुन्या घराला आग लागल्याची घटना आज रविवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता च्या दरम्यान निदर्शनास आली. आग दिसताच शेजाऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून शेजारील असलेल्या नातेवाईकांनी सदर आग पाणी झोकून विझवल्याची माहिती आहे.

राहुल पांडुरंग लोणारे यांचे नवरगाव येथील जुने माती कवेलू चे घर आहे. नवरगाव च्या जुन्या घरात जुने सामान, घरेलू साहित्य, लाकडी फाटा तसाच ठेवला असतांना आज रविवार ला सायंकाळी शॉर्ट सर्किट ने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करायच्या अगोदर च शेजारी असलेल्या नातेवाईकांना ही आग निदर्शनास येताच त्यांनी पाणी झोकून सर्व आग नियंत्रणात आणली.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व महावितरण कंपनी चे अधिक घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान, अचानक शॉर्ट सर्किट ने लागलेल्या आगीने राहुल पांडुरंग लोणारे यांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत असून पुढील मात्र, अनर्थ टळला असेही बोलल्या जात आहे.
Previous Post Next Post