सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : स्वर्गीय रामचंद्र तुकाराम खाडे यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 84 होते. काँग्रेस नेते तथा रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड चे अध्यक्ष संजय खाडे यांचे ते वडील होत.
स्वर्गीय रामचंद्र खाडे ह्यांनी सामाजिक क्षेत्र म्हणून लोक कल्याण सोसायटीचे फाउंडर,सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून पद भूषवले तसेच उत्कृष्ट शेती विषयक ज्ञान असलेले शेतकरी कुटुंबातील ऊकणी या गावातील रहिवासी होते.
त्यांच्यामागे पत्नी सौ सीताबाई रामचंद्र खाडे त्यांना दोन मुलं संजय खाडे व विजय खाडे, आणि दोन मुली शोभा नंदकिशोर ठाकरे व छाया खुशालराव पिंपळशेंडे असा मोठा आप्त परिवार आहे. आज गुरुवार दिनांक 19/10/2023 ला मोक्षधाम वणी येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. यावेळी मित्र परिवार, नातेवाईक तथा संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी स्वर्गीय रामचंद्र खाडे यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी सदस्य रामचंद्र तुकाराम खाडे अनंतात विलीन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2023
Rating: