महिला शेतकऱ्याचा बैल सर्पदंशाने ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : बैलजोडी विना शेती करणे शेतकऱ्याचे मोठ कठीण काम असते, त्यातही जोडी पैकी एक बैल नसला की, शेतीची मशागत करणे खूप अवघड जातं. अशीच काही स्थिती मांगरूळ येथील महिला शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. आज गुरुवार (ता.19) रोजी बैल चरण्यासाठी स्वतः च्या वावरात गेला, अशातच बैल चराई करित असताना त्या बैला ला सर्प दंश झाल्याने तो जागीच ठार झाल्याची दुःखद घटना घडली.
श्रीमती शकुंतला माधव खडसे असे बैल दगावलेल्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. शकुंतलाबाई यांच्या स्वतः च्या शेतात बैल चरताना त्याला सर्प दंश होऊन एक बैल जागीच ठार झाला ही घटना दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेसहा वाजताचे सुमारास घडल्याचे उघडकीस आले. सदर घटनेने महिला शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या असून खरीपाचा हंगाम, शेतात पिके बैलजोडी विना शेती करणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे. आपला एक बैल दगावल्याने श्रीमती चंद्रकलाबाई खडसे ह्या फार दुखावल्या असून त्या विधवा आहे त्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. 
महिला शेतकऱ्याचा बैल सर्पदंशाने ठार महिला शेतकऱ्याचा बैल सर्पदंशाने ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.