संजय खाडे यांच्या तर्फे गोरक्षणला 51 हजारांची मदत


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : येथील उज्ज्वल गोरक्षण संस्थेला श्री रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.चे अध्यक्ष संजय खाडे यांनी 51 हजारांचा धनादेश मदत म्हणून दिला. यवतमाळ जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील समाज कार्यात ‘काँग्रेस नेते तथा वसंत जिनींग चे संचालक संजय खाडे नेहमी आग्रेसर असे” असे प्रतिपादन लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष संगीता खाडे, यांनी केले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.

यामध्ये लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष संगीता संजय खाडे, रंगनाथस्वामी अर्बन निधीचे उपाध्यक्ष ईश्वर खाडे, उज्ज्वल गोरक्षणाचे पदाधिकारी राजाभाऊ पाथ्रडकर, सुधाकर काळे, अजय चेंदेर, प्रकाश कवरासे, अनुप खत्री, डॉ. राठोड, संजय पांडे, भगवान पोपली, मनोहर नागदेव, चंद्रकांत जोबनपुत्रा, आनंद खोकले, सुहास लांडे, प्रतीक गेडाम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"यावेळी गोमातेला सहकुटुंब सहपरिवारासह चारा खाऊ घालून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संजय खाडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की मुक्या प्राण्यांना अभय हिच खरी ईश्वर पूजा असल्याचे यांनी  सांगितले."

संजय खाडे यांच्या तर्फे गोरक्षणला 51 हजारांची मदत संजय खाडे यांच्या तर्फे गोरक्षणला 51 हजारांची मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2023 Rating: 5
Powered by Blogger.