वणी-शिरपूर-शिंदोला रस्त्यावर आरटीओची धडक कारवाई

सह्याद्री चौफेर | राजू राजू डावे 

वणी: तालुक्यातील शिरपूर, शिंदोला रोडवर अवैधरित्या धावणारी ओव्हरलोड वाहने, हेल्मेट नसलेले चालक आणि फिटनेस, विमा, पीयूसी व इतर कागदपत्रे चुकविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 

तालुक्यात नियमांना डावलून वाहतूक करणे, विना परवाना बाईक चालवीने यासारख्याचे प्रमाण वाढत आहे. बेधुंद धूम ठोकणाऱ्या व अवैधरीत्या ओव्हरलोड धावणारे वाहतूक यांच्या वर कारवाई चा बडगा उगारला जात आहे. दरम्यान, 50 चालकांवर श्वास विश्लेषक (अल्कोहोल टेस्ट) करण्यात आले. या कारवाईत 26 दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून 2 लाख 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एअर व्हेलॉसिटी टीमचे अधिकारी गणेश पवार, राहुल चौधरी, परेश गवसणे, अक्षय सोळंकी, सतीश टोळे, नितीश पाटोकर आणि चालक वांद्रे, तायडे यांनी ही कारवाई केली.
वणी-शिरपूर-शिंदोला रस्त्यावर आरटीओची धडक कारवाई वणी-शिरपूर-शिंदोला रस्त्यावर आरटीओची धडक कारवाई Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2023 Rating: 5
Powered by Blogger.