काल वणी बस स्थानक येथे आढळून आलेल्या महिलेची ओळख पटली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गुरुवार दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी वणी बस स्थानकावर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर महिलेला वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रदिप भनारकर यांनी वणी ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मात्र मृतक महिला अनोळखी असल्याने पोलिसांना ओळख पटविण्यासाठी मोठे आव्हान होते, या घटनेची वार्ता पोर्टलच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. ती बातमी भोंगळे ले-आऊट मधिल ईश्र्वर गणपत वडस्कर (मूळ गाव मच्छिन्द्रा) या शिक्षकांनी वाचली व ते ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी त्या महिलेला ओळखले व त्यांनी तिच्या नातेवाईकांना माहिती दिली.

मृतक महिलेचे नाव रिता निलेश आसुटकर रा.हिवरा (मजरा) तालुका मारेगाव येथील असून हल्ली ती माहेरी पठारपूर येथे आईकडे वास्तव्यास होती. गुरुवारी ती आईला सांगुन वणी येथे आली होती. रात्री तीचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.
काल वणी बस स्थानक येथे आढळून आलेल्या महिलेची ओळख पटली काल वणी बस स्थानक येथे आढळून आलेल्या महिलेची ओळख पटली Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2023 Rating: 5
Powered by Blogger.