वेगाव येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कौशल्य युक्त महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात ५११ स्व.प्रमोदजी महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन दिनांक १९ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले.त्यात यवतमाळ जिल्ह्यातील विस केंद्रापैकी मारेगाव तालुक्यात वेगाव येथे सदर केंद्राचे उद्घाटन झाले.
      
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वेगावच्या सरपंच सौ.उषाताई देरकर ह्या होत्या.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे म्हणाले की,ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातुन मोफत विविध कौशल्य प्राप्त करुन विविध कंपन्यामध्ये कुशल कामगार म्हणून रोजगार प्राप्त करावा अथवा प्रधानमंञी रोजगार योजनेतुन सदतीस टक्के सुटीवर पंचवीस लाखापर्यंत कर्ज प्राप्त करुन व्यावसायिक व चांगले उद्योजक बनावे.

यावेळी मंचावर भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,जेष्ठ नेते शशिकांत आंबटकर, मालाताई गौरकार, नरेश वाघमारे, मधुकर टोंगे, भाऊराव थेटे, मारेगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक जे.एन.गड्डमवार, वऱ्हाटे मॅडम, उइके मॅडम इत्यादी हजर होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन तथा प्रास्तविक कु.भाग्यश्री मेश्राम यांनी तर आभार कु.संहीता गाणार यांनी मानले.कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन ट्रुली युवर्स वेलफेयर सोसायटी यवतमाळ चे श्री.संदीप दुबे यांनी केले.
वेगाव येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन वेगाव येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 20, 2023 Rating: 5
Powered by Blogger.