प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम - आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड, मुख्याधिकारी अरुण भगत, गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी दिनकरराव पावडे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, भाजपाचे अविनाश लांबट, कृषी अधिकारी वानखेडे, वाघमारे, नगर पंचायतचे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की, ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी मुनेश्वर, भारतीय जनता युवा मोर्चाचे अनुप महाकुलकर, यांच्यासह सर्व अधिकारी, विभाग प्रमुख, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात माझी माती, माझा देश अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगून आमदार श्री. बोदकुरवार म्हणाले की, शहिद, वीर, जवानांना अभिवादन करून देशपातळीवरील एक अतिउच्च स्मारक दिल्लीमध्ये तयार होत आहे, वणी विधसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे, कारण मी या महोत्सवात सहभागी होता आले, पुढे बोलताना म्हणाले की, त्याठिकाणी ही आपल्या प्रत्येक गावातील, देशभरातील माती समर्पित करणार आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिलेला हा एक स्तुत्य उपक्रम तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यासह संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत शाळा मिळून तालुका भर साजरा केला.
सुरुवातीस पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुकास्तरावरून आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भजन गायन, शपत घेण्यात आली. गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे अमृत कलश सुपुर्त केले. तसेच पंचायत समिती ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अशी अमृत कलश यात्रा पार पडली. शेवटी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात या यात्रेचा समारोप करण्यात आला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम - आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2023
Rating: