सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : नवीन संसद भवन पाहण्याची इच्छा अनेकांची होते. परंतु नवीन संसदेत पाय ठेवणे एवढी साधी बाब नाही. भव्य दिव्य इमारत कडेकोट बंदोबस्त, शेकडो सुरक्षा कर्मी यामुळे तिथे जाणे सोपे नाही. परंतु वणी उपविभागातील सुप्रसिद्ध असलेली आयकॉन गर्ल कु. स्वामिनी कुचनकर हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यमातून नवीन संसद भवन पाहण्याचे स्वप्नं पूर्ण झाले. त्यामुळे तिचा पंखांना पुन्हा उडण्याचे बळ मिळाले आहे.
कुमारी स्वामिनी प्रशांत कुचनकर डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल निलजई (सुंदरनगर) मध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला नुकतेच लोकार्पण झालेले संसद भवन पाहायचे होते ते स्वप्न तिचे पूर्ण झाले आहेत. स्वामींनी ने आपली इच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. नुकतेच लोकार्पण झालेले देशाचे नवीन संसद भवन पाहण्यासाठी शैक्षणिक दौरा केला.
यात स्वामींनी ला देशाचे संसदीय अधिवेशन चालतात अश्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात जाऊन कामकाज कसे चालतात. सत्ताधारी आणि विरोधी सदस्य कोणत्या दिशेला बसतात. बहूमत चाचणी च्या वेळेस इलेक्ट्रॉनिक बटन कश्या वापरतात. वेळचं उल्लघन कसे केले जातात. लोकसभेच्या सभागृहाला हिरव्या तर राज्यसभेच्या सभागृहाला लाल रंगाने ओळखले जातात. तसेच सेंट्रल हॉल चे सुद्धा महत्व समजून घेतले. या सभागृहाला राष्ट्रपती संबोधित करतात. या सर्व बाबींचा अभ्यास संसदेच्या अधिकृत व्यक्तीकडून शिकून घेतला.
इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या स्वामिनी चे स्वप्नं झाले पूर्ण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2023
Rating: