सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
पांढरकवडा : आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव फकूजी कोडापे तथा आदर्श शिक्षिका राज्य पुरस्कार प्राप्त अनुसया लक्ष्मणराव कोडापे यांचे सुपुत्र डॉ. सतीश कोडापे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे एम.डी. साठी निवड झाली. त्यानिमित्त शासकीय विद्यानिकेतन केळापूर येथील माजी विद्यार्थी तर्फे त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या. डॉ. सतीश लक्ष्मणराव कोडापे हे शासकीय विद्यानिकेतन केळापूर शाळेचे ते माजी विद्याथी आहेत. त्यामुळे त्या शाळेचे शिक्षक, माजी शिक्षक मारोती मडावी सर, धुर्वे सर, मोहुर्ले सर, माजी विद्यार्थी डॉ. मोहन गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी झरी अभियंता भोजराज मैहसकर, संतोष उईके, योगेश उघडे, वैभव जाधव, दिनेश नागभीडकर, यांनी त्यांचे स्वागत केले. या निवडीबद्दल डॉ कोडापे यांचे सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. सतीश कोडापे यांची एम.डी.साठी निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2023
Rating: