सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के
महागांव : कासारबेहळ लगत गोठ्यातील वाघाने गोऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची 10 ऑक्टोबर रोजीच्या रात्रीची घटना घडल्याची सकाळी उघडकीस आली. सदर परिसरात वाघाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्यातील कासारबेहळ नजिक टि- पाईट जवळ असलेल्या बालाजी बापुराव बिचकुले यांच्या गट क्रं.122 मथिल असलेल्या टिन पत्राच्या गोठ्या मागिल बाजुने वाघ आतमध्ये शिरला, ज्यामध्ये दोन महिन्याचा गोरा होता त्यास ऊसात नेऊन ठार केले असल्याची माहिती आहे.
या आगोदर ऊतम लांडगे यांचे तिन जनावर, पांडुरंग पावडे, व शंकर पाटे यांचे जनावर वाघाने मारले होते. असे स्थानिकांनी आमच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले. सदर वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर चांगलेच धास्तावले आहेत. अगदी गावालगत असलेल्या भागात वाघाने दोन महिन्याच्या पशुधनाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.
कासारबेहळ शेत शिवारात हिंस्र प्राण्यांचा वावर हा नेहमीचाच आहे. अधून-मधून या परिसरात वाघोबाचे दर्शन परिसरातील नागरिकांना नित्याचेच झाले आहे. परंतु पशुधनाला शेत शिवारात न्यावे, ठेवावेच लागत असल्याने स्थानिक नागरिकांचाही नाईलाज आहे.
दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी रात्री शेतकरी बालाजी बिचकुळे यांच्या शेतातील गोठ्यामधून दोन महिन्याच्या गोऱ्याला उसाच्या बनात घेऊन गेले त्याचा फडशा पाडला.
बालाजी बापूराव बिचकुले असे संबंधित पशुधन मालकाचे नाव आहे.
तूर्तास आपले पशुधन गमविलेल्या बालाजी यांचेवर आर्थिक संकट कोसळले असून शासन मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहे.
मागच्या वर्षी सिंगल फेज साटी कासारबेहळ,सेवानगर, व वरोडी येथील शेतकऱ्यांनी तहसिलवर मोर्चा काढला होता. परंतु अजूनही सिंगल फेज चालु झाले नाही. या भागाचे विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे लोकप्रतिनिधी आ. नामदेवराव ससाने या गंभिर विषयाकडे लक्ष देतील का असे शेतकऱ्यांकडुन ओरड होत आहे.
उसाच्या बनात नेऊन वाघाने पाडला गोऱ्याचा फडशा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 11, 2023
Rating: