सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मारेगाव तालुक्यातंर्गत 56 ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त आयोजित 'माझी माती माझा देश' या उपक्रमातून संकलित झालेली या मातृभूमीची माती तालुकास्तरावर एकत्रित करून एका अमृत कलशात संकलित करण्यात आली.
सदर अमृत कलशाचे आज दि.10 ऑक्टोबर 2023 रोजी पंचायत समिती मारेगाव येथील प्रांगणात वणी विधानसभा सभेचे आमदार मा श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून भव्य शोभा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्राम सदस्य, ग्रामसेवक, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मोबीलायजर, बँड पथक, लेझिम, गुरुदेव भजनी मंडळ, शिक्षक वृंद, पत्रकार बंधू तथा पं स चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत 'पंच प्रण शपथ' देण्यात आली.
कार्यक्रमाला तालुक्याचे तहसीलदार उत्तम निलावाड, गविअ पद्माकर मडावी, मुख्याधिकारी भगत, नपचे नगराध्यक्ष डॉ मस्की, बा वि प्र अ कळमनकर, पं स कृषी विभागाचे वानखडे तथा वाघमारे साहेब, इत्यादी मान्यवर, मोठ्या संख्येने नागरिक व पं स चे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधाकर जाधव विअ यांनी केले तर प्रास्ताविक श्री मडावी गविअ यांनी केले.
'माझी माती माझा देश' अंतर्गत तालुका स्तरीय अमृत कलश यात्रेची भव्य यात्रा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2023
Rating: