अनुसूचित जमातीत धनगर समाजाला समाविष्ट करू नये- बिरसा ब्रिगेड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 वणी : आदिवासी आरक्षण हे संवधानिक हक्क असून अनुसूचित जमाती मध्ये धनगर किंवा अन्य कोणत्याही जातीची घुसखोरी बेकायदेशीर आहे, धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणामध्ये समावेश करण्यात यावा म्हणून प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असून, ती मागणी असंवधानिक आहे. सदर धनगर व धनगड दोन्ही भिन्न जाती आहे. त्यामुळे धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देता येणार नाही. असे स्पष्ट सविस्तर अहवाल महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे,असे असताना धनगरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावी अशी मागणी चुकीची आहे. त्यांचा आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये असे निवेदन बिरसा ब्रिगेड वणी शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
   
आदिवासी संस्कृती, परंपरा, राहणीमान, जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती, तसेच विशिष्ट प्रदेश वास्तव्यात असलेला व स्वतंत्र बोली भाषा असलेला समाज आहे. आदिवासी संस्कृती ही धनगर समाजाची अजिबात मिळती जुळती दिसत नाही, आदिवासी समाजाचे रितीरिवाज रूढी परंपरा भाषा जीवनशैली स्वतंत्र आहे. आदिवासी समाज व धनगर हे दोन वेगवेगळे समाज आहे, आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठलाही बाबतीत ताळमेळ बसत नसून आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं ७ टक्के आरक्षणाच्या पण मिळाले नाही. कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासी बोगस जात पडताळणी दाखले देत आदिवासीची पीछेहाट झालेली आहे. खोट्या व बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या लाखो नोकऱ्या अडकून बळकावले आहे. अशा एकूण ७५ हजार बोगस कर्मचाऱ्यांना आदिवासींच्या लाखो नोकऱ्या हडपून बळकवले आहे. अशा एकूण ७५००० कर्मचाऱ्यांचा सेवा संघ संरक्षण देण्याचा निर्णय २९ ला शासनाने घेतलेला आहे. गैर आदिवासींनी अनेक क्षेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होऊ नये याबाबतचे आरक्षणात धनगर समाजाला समावेश करू नये.    
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बिरसा ब्रिगेड व आदिवासी समाजाच्या वतीने ज्वलंतशील आंदोलन करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील, करिता 'धनगर आरक्षण' या प्रश्नाला घेऊन बिरसा ब्रिगेड च्या वतीने आज उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन देताना उपस्थित सुधाकर चांदेकर (बिरसा ब्रिगेड अध्यक्ष), कवडूजी उईके (तालुका संघटक), विजय गेडाम, प्रशांत जुमनाके (बिरसा ब्रिगेड प्रसिद्ध प्रमुख) सुभाष पेंदाम, प्रवीण आत्राम, राजू गेडाम, प्रदीप गेडाम, दत्ता कुळमेथे, लक्ष्मण परचाके, निखिल खिरटकर, गोपाल हनुमंते , केशव मेश्राम, संतोष कुडमेथे, गणेश कोरचे , समीर मडावी, लहानू सालुरकर, पवन मेश्राम, मारुती कुमरे, नथू कुमरे, जयंत गेडाम, पांडुरंग पेंदोर, रोहित टेकाम, अर्चनाताई किनाके, सविता कुळमेथे, प्रियंका कुळमेथे, प्रियंका कुळसंगे, शितल मडावी, विजय केराम, हंसराज भादेकर, सुकेशना गेडाम आदी उपस्थित होते.
अनुसूचित जमातीत धनगर समाजाला समाविष्ट करू नये- बिरसा ब्रिगेड अनुसूचित जमातीत धनगर समाजाला समाविष्ट करू नये- बिरसा ब्रिगेड Reviewed by सह्याद्री चौफेर on October 10, 2023 Rating: 5
Powered by Blogger.