सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : वनोजा देवी ग्रामपंचायतचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, उपसरपंच प्रशांत भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश लांबट मित्र मंडळाच्या वतीने 7 ऑक्टोबर रोजी मार्डी सर्कल मध्ये केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच विविध सामाजिक उपक्रमच्या माध्यमातून मारेगाव तालुक्यातील आज शनिवारी वनोजा (देवी) येथील जि प शाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले,
त्यात 190 लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. सर्वप्रथम माजी सैनिक धनराज दामोदर डवरे च्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक अविनाश लांबट, माणिकराव कांबळे, युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता प्रवीणदादा बोथले यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक सौ प्रतिभा तातेड, सौ सपना कोठारी, सौ सुषमा दुग्गड, व आदित्य तातेड यांनी केले. दरम्यान त्यांना त्यांच्या हितचिंतकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, सोशल मीडिया, दूरध्वनी, मॅसेज करून दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छासह निर्मिकाकडे निरोगी आरोग्याची प्रार्थना केली.
या शुभदिनी बोलताना उपसरपंच प्रशांत भंडारी म्हणाले की, सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत. सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा होतोय याचे मला समाधान आहे. यनिमित्ताने मी सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद स्वीकारतो...धन्यवाद! मी मनःपूर्वक सर्वांचे आभार मानतो.
यावेळी कृ.उ.बा. समितीचे संचालक अविनाश लांबट, सरपंच सुरेशदादा लांडे, तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण बोथले, अनंता जुमडे, विजय मेश्राम, शेखर काळे, निलेश झाडे, व उदास खिरटकर, अयुब पठाण, गणेश, अमोल, शंकर आदिंच्या उपस्थितीत प्रशांत भंडारी यांना जन्मदिनाच्या व नवं वर्षच्या शुभेच्छा सह 'बर्थडे' साजरा केला.