मारेगाव तालुक्यात डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण, साथीचे आजार वाढले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत असते. मात्र,पावसाळ्यात जागोजागी सांडपाणी व गावालगत पाण्याचे डबके साचलेले आढळून येते. मारेगाव तालुक्यातील बहुतांश गावांत नालेसफाईची कामे होत नसल्याने डासांच्या प्रमाणात वाढ होऊन आजाराला आयतेच निमंत्रण मिळत आहे.विविध आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक हैराण आहेत. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक व्यवस्था पुरती कोलमडलेली असताना आरोग्याचा मात्र आर्थिक संकटात टाकत असल्याचे चित्र आहे.

मारेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून अद्यापपर्यंत डासांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ व त्यामुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. गावागावांत पूर्वी होत असलेल्या फवारणीमुळे डासांचा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या फॉगिंग मशिन धुळखात प्रादुर्भाव कमी होऊन आरोग्यावर अंकुश मिळत असे, मात्र अलीकडे हा प्रकार कायमचा बंद झाल्याचे दिसून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होताना दिसत आहे.

प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस उपाययोजनेची गरज असताना मात्र, तसे होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. गावात स्वच्छता अभियान राबविणे, तसेच गावातील सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच ग्रामीण भागात वाढत असलेले आजार लक्षात घे गावागावांत धूरफवारणी ग्रामपंचायतींनी करावी. तसेच याकडे वरिष्ठांनीही लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मारेगाव तालुक्यात डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण, साथीचे आजार वाढले मारेगाव तालुक्यात डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण, साथीचे आजार वाढले Reviewed by सह्याद्री चौफेर on October 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.