सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहापळ ग्रामपंचायतीच्या वतीने फॉगिंग मशीन द्वारे फवारणीला सुरुवात करण्यात आली. काल शनिवार पासून गावात आरोग्याच्या दृष्टीने या फवारणी केली जात आहे.
मागील काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात साथीच्या आजाराने थैमान घातले, त्यामुळे विविध आजाराने डोकं वर काढल्याने तालुकास्तरावरून धूर फवारणीची मोहीम राबविण्यात यावी अशी ग्रामपंचायती मागणी होती, मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पहापळ गावांमध्ये फाॅगिंग मशीनने धूर फवारणी करण्यात आली.
ग्रामपंचायत सरपंच श्री राहुल आत्राम तथा पेसा कोष समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके व ग्राम. सदस्य यांच्या पुढाकाराने गावासह परीसरात तापाचे व डेंग्यूसदृश आजाराने डोकं वर वाढू नये, याकरिता ग्रामपंचायतीने तथा आरोग्य विभागाने तत्काळ फाॅगिंग मशीन द्वारे धूर फवारणी कार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, धूर फवारणीची महत्व समजून व काळजी घेत असल्याचे चित्र पहापळ ग्रामपंचायतचे पहावयास मिळाले.
विशेष उल्लेखनीय की,वेगांव आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या पहापळ आरोग्य उपकेंद्र येथील कॅम्युनिटी हेल्थ आॅफीसर, राजश्री तिरपुडे (CHO), आरोग्य सेविका पुसदेकर (ANM) यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला आवश्यक औषध उपलब्ध करून दिली. त्यांचे सहकार्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
पहापळ येथे फाॅगिंग मशीनद्वारे धुर फवारणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 08, 2023
Rating: