सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : तालुक्यात एकामागे एक आत्महत्येचे सत्र सुरुच आहेत. कायर, गोपालपूर येथील घटना ताज्या असताना आज पुन्हा मौजा सावंगी (जूनी) येथील एका ५४ वर्षीय इसमाने आज दिनांक १६/१०/२०२३ रोजी आपल्या राहत्या घरी अदांजे दुपारी २.३० च्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. त्यामुळे सतत होणाऱ्या आत्महत्येच्या घटनेने तालुका हादरला असून दिवसेंदिवस आत्महत्येचा आलेख वाढत आहे.
गोकूळ पांडूरंग भोयर रा. सावंगी (जुनी) असे विष प्राशन करून आत्महत्यासारख्या टोकाचे पाऊल उचललेल्या इसमाचे नाव आहे. त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथे नेत असताना सदर इसम मृत झाला. मृतक भूमीहिन असल्याची साझा अंतर्गत माहिती आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट असून त्याच्या पाठीमागे
आई अंजनाबाई पांडुरंग भोयर, मुलगा सुरज गोकूळ भोयर, सून प्रणाली सुरज भोयर असा परिवार आहे. दरम्यान, तालुक्यात कुठे ना कुठे विष घेणे, गळफास लावून जीवन यात्रा संपवणे यासारख्या घटना सातत्याने घडत आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकात जनजागृती करणे आता गरजेचे झाले आहे.