खोटी ग्रामसभा व खोटा ठराव घेणं येणार 'त्या' ग्रामसेवकाच्या अलंगट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : काल रविवारपासून गोंडबुरांडा येथील आदिवासी बांधवांचे पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीच्या विरोधात आमरण उपोषण सुरु होते, आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. दुपारनंतर चर्चा, व प्रकरण स्टडी झाल्यानंतर लेखी पत्रातील विषय जाहीरपणे उपोषणस्थळी वाचण्यात आला. सर्वानुमते 'ओके' म्हटल्यावर त्याची सांगता (ता.16) ला सायंकाळी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आमरण उपोषणकर्त्यांना शरबत पाजण्यात आले. यावेळी संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष सुमित गेडाम, वंचितचे तालुका उपाध्यक्ष संजय जिवने, ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, पिसगांव आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष सुदर्शन टेकाम, सराटीचे सरपंच तुळशीराम कुमरे, शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम, सामाजिक कार्यकर्ता हरिभाऊ रामपुरे, मारोती आत्राम, संविधानिक हक्क परिषदेचे किसन मोहारे यांच्या सह विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी, व सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायती असून त्या ग्रामपंचायत पैकी 24 पेसा ग्रामपंचायत आहेत. या पेसा ग्रामपंचायतीला घटनेने विशेष अधिकार दिले आहे. हे सर्वश्रुत आहे. असे असताना गोंडबुरांडा येथील सचिव जाधव यांनी त्या अधिकाराचे उलंघन केले, कायद्याची अवहेलना करीत खोटी ग्रामसभा, बनावट ठराव तयार करून आशा सेविकेची निवड केली. ही खोटी बाब जेव्हा नागरिकांच्या लक्षात आली तेव्हाच संतापलेल्या काही ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालय गाठून गटविकास अधिकारी मडावी यांना निवेदन देण्यात आले होते. आजपर्यंत चौकशी, चौकशी, व फक्त चौकशी यातच संबंधित अधिकाऱ्याने वेळ घातल्याचा थेट आरोप उपोषणकर्ते अर्जुन आत्राम, सागर आत्राम, बाली आत्राम व प्रविणा आत्राम यांनी केला. दरम्यान, आक्रमक होत उपोषणकर्त्यांनी ठणकावून सांगितल्याने गटविकास अधिकारी, यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थित दि.5/6/2023 रोजी ग्रामपंचायत गोंडबुरांडा येथील झालेल्या ग्रामसभे मध्ये आशा सेविकेची निवड योग्यरित्या झाली किंवा नाही याची त्वरित चौकशी करण्यात येईल, संबंधित ग्रा.पं. सचिव यांच्या वर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे लेखीपत्र देऊन आश्वासन देण्यात आले आहे. सदर चौकशी आठ दिवसात पूर्ण करण्यात येईल असे पत्रात नमूद आहे. त्यामुळे खोटी ग्रामसभा व खोटा ठराव येणार घेणं 'त्या' ग्रामसेवकाच्या अलंगट येणार आहे यात आता शंका राहिली नाही. तूर्तास गोंडबुरांडा येथील आशा सेविकेची निवड वादाच्या भोवऱ्यात आली आहे. शेवटी रविवारपासून आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याना गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे व शिवसेनेचे सुनील गेडाम यांच्या हस्ते शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. मात्र, हा लढा न्याय जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत उलगुलान सुरू राहणार आहे, असे प्रगतशील विचारवंत गीत घोष, संघटक सुनील गेडाम यांच्या सह उपोषणकर्त्यांनी 'सह्याद्री चौफेर'ला बोलताना सांगितले. 
यावेळी तालुक्यासह गोंडबुरांडा येथील असंख्य महिला,पुरुषांनी तालुक्याच्या ठिकाणी सुरु असलेल्या उपोषण कर्त्यांचा "हौसला बुलंद" करण्यासाठी उपोषणमंडपी सकाळपासून हजेरी लावली होती.
खोटी ग्रामसभा व खोटा ठराव घेणं येणार 'त्या' ग्रामसेवकाच्या अलंगट खोटी ग्रामसभा व खोटा ठराव घेणं येणार 'त्या' ग्रामसेवकाच्या अलंगट  Reviewed by सह्याद्री चौफेर on October 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.