सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील गोंडबुरांडा येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी अफलातून कामगिरी केल्याचे व त्यास पाठपुरावा करित असल्याच्या पंचायत समितीच्या विरोधात काल रविवारपासून पंचायत समितीच्या समोर गोंडबुरांडा येथील पुरुष महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.
या उपोषणकर्त्यांचे तक्रार एकच आहे की, दि 5/6/2023 रोजी घेतेलेली ग्रामसभा, व ग्रामसभेत घेतला ठराव हा खोटा आहे, बनावट आहे. हा अफलातून कारभार ग्रामपंचायत सचिवानी पेसा कायद्याची पायमल्ली करित गैर आदिवासी उमेदवाराची निवड केली, याला पाठीशी पंचायत समितीचे अधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषी कारवाई कडक करण्यात यावी, अशी मागणी उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले आहे. ते पुढे बोलताना असेही म्हणाले की, यात नागरिकांच्या सह्या ज्यांच्या घेतल्या त्या गावातील विविध काम केले,त्याचा अभिप्राय म्हणून घेतल्याचे धक्कादायक माहिती दिली. त्यामुळे या आशा निवड प्रक्रियेत काही चिरीमिरी तर झाली तर नाही,अशी शंका उपस्थित होत आहे. असे असेल तर संबंधितांना घरी बसण्याची वेळ आल्याशिवाय पर्याय नाही, असे एकंदरीत या प्रकारातून दिसून येतेय...
गेल्या महिन्याभऱ्या पासून हा आशा निवडीचा विषय गावापातळीवरून शहरापर्यंत ते जिल्हा कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. याबाबत निवेदने, विविधांगी चर्चा होत आहे मात्र, पाणी मुरते कुठे हे कळायला मार्ग नाही. गोंडबुरांडा पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे प्रथम प्राध्यान आदिवासी उमेदवाराला दिल्या गेल्याने त्याला बगल देत गैर आदिवासी अर्जदाराची निवड केल्याने संतापलेल्या गोंडबुरांडा येथील काही नागरिकांनी कालपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणास अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना, गावातील असंख्य महिला पुरुषांनी समर्थन देत पेंडालस्थळी भेट दिली आहे. त्यामुळे या सर्व गैर प्रकारचा काय न्याय निवडा लागतो याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. तूर्तास येथील नागरिकांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
उपोषणाचा दुसरा दिवस...बनावट कागदीघोडे नाचवून केली आशा सेविकेची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2023
Rating: