सह्याद्री चौफेर | राजू डावे
सूर्यभान कृष्ण मोते (६२) रा. गोपालपुर (खां.) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या भूमिहीन शेतमजूर इसमाचे नाव आहे. मृतकाने रविवारच्या रात्रौ साडे आठ वाजताच्या दरम्यान, आपल्या राहत्या घरी विषारी औषधं ग्रहण केले, त्याला उपचाराकरीता चंद्रपूर येथे नेले असता चंद्रपुर जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री १२ वाजता च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सदर मृतक हा भूमिरिन शेतमजूर होता. मृतकाला दारूचे व्यसन होते दारुच्या नशेतच त्याने 'विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याबाबत स्थानिक चौकशी अहवाल नुसार माहिती मिळली. मात्र, वणी तालुक्यात सातत्याने आत्महत्या होत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
गोपालपूर येथील इसमाची विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 16, 2023
Rating: