नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांच्या मागणीला यश; मारेगावातील मुख्य रस्त्यावरील गड्डे बुजविण्यास झाली सुरुवात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : 'रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ता' असे चित्र मारेगावातील रस्त्याचे असताना जनतेच्या सोयिंच्या दृष्टीने तत्काळ खड्डेमय रस्ते बुजावण्यात यावे असे,येथील नगर पंचायतचे नगराध्यक्ष वारंवार संबंधित विभागाला मागणी करत होते, त्याकरिता पत्र व्यवहार करित होते. दीर्घ प्रतीक्षेत, या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने मारेगावातील प्रमुख मार्गाचे गड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. 
मारेगाव शहरातील अनेक मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी गड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना वाहतूक करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असे, शिवाय अपघाताचीही शक्यता वर्तविली जात होती. वाहनधारकासह पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात ओरड होती. परिणामी बाहेरगाव, तथा मारेगावातील ग्रामवासियांची फार मोठी गैरसोयहोत होती.त्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवरील गड्डे तत्काळ बुजविण्यात यावे अशी सतत मागणी नगराध्यक्ष डॉ मस्की यांनी लावून धरली. तेव्हा मारेगांव ग्रामवासीयांना तसचे बाहेरगांवचे जनतेला प्रवास करणे सोयीचे व सुखकर होण्याचे दृष्टीने नगर पंचायत मारेगांव हद्दीतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगांव अधिनस्त (मारेगांव मार्डी रोड, मारेगांव घोन्सा रोड व वणी- मारेगाव- यवतमाळ रोड) रोडवरील गड्डे बुजविण्यास अखेर सुरुवात झाली असून डीव्हायडर मधील झाडांच्या तसेच रोड लगतच्या झाडांच्या अनावश्यक फांदयांची कटाई करण्यात येणार आहे. 
असं म्हटले जात की, 'देर आए दुरुस्त आए'...नगर पंचायत मारेगांव हद्दीतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगांव अधिनस्त रोडवरील गड्डे बुजविणे व डीव्हायडर मधील झाडांच्या तसेच रोड लगतच्या झाडांच्या अनावश्यक फांदयांची कटाईही करण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरगाववरून येणाऱ्या जनतेला व मारेगाव ग्रामवासियांना प्रवास करणे आता सोयीचे व सुखकर होणार आहे. असे नगर पंचायतचे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांनी माहिती देताना सांगितले आहे. 

नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांच्या मागणीला यश; मारेगावातील मुख्य रस्त्यावरील गड्डे बुजविण्यास झाली सुरुवात नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांच्या मागणीला यश; मारेगावातील मुख्य रस्त्यावरील गड्डे बुजविण्यास झाली सुरुवात Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.