सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के
महागांव : हिंगोली जिल्हयातील ईसापुर, सिध्देश्वर, येलदरी धरणग्रस्तांची राष्ट्रीय युवा नेते धरणग्रस्त-विस्थापितांच्या समस्यांचे अभ्यासक ॲड. सचिन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 2 ऑक्टो 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाईकनगर हिंगोली येथे भव्य धरणग्रस्त हक्क परिषद पार पडली. यावेळी तिन्ही प्रकल्पातील १० हजार बाधित धरणग्रस्त उपस्थित होते.
ॲड. सचिन नाईक म्हणाले ईसापुर, सिध्देश्वर, येलदरी
धरणग्रस्तांना मागील 40 वर्षापासून आर्थिक-सामाजिक- शैक्षणिक-सांस्कृतिक न्यायापासून वंचित ठेवले आहे. धरणग्रस्तांची वर्तमान परिस्थिती जाहिर करून लेखी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा, अन्यथा सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी माजी आमदार रामरावजी वडकुते, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, धरणग्रस्त विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवि शिंदे, दिपकराव वडकुते, माजी जि.प. उपाध्यक्ष सद्वाराव मोहट, साहेबराव मस्के, बाबुराव शिंदे पाटील, शिवप्रसाद मस्के, पंकज हाडबे, डॉ. रमेश मस्के, बाजीराव मरक, संजय राठोड, राजु थिटे, भगवान पावरे, डॉ. सतीश पाचपुते, वामनराव पोळे, भारकरराव बेंगाळ, पंजाबराव वडकुते, विनोद मस्के. सचिन पोले, प्रा. गजानन हाके, आकाश कारगुडे, अॅड. विजय राऊत, एकनाथ हराळ, यश कोकरे, शरद पोले, रविद्र गडदे, प्रकाशराव पोले, विकास राहुल मस्के, शुभम बियाणी, भास्करराव पोले, राम जपते, विजयराव नाईक, देवानंद चंद्रवंशी, कचरु बुरकुले, सुरज वडकुते, पंढरीनाथ ढाले, शिवाजी ढाले, विनोद जैस्वाल, महेंद्र मस्के, विलासराव मस्के, वसंतराव मस्के, आनंदराव मस्के, विशवाबर सुकळकर, गजानन मस्के, धुपतरा मस्के, सह विदर्भातुन महागाव पुसद तालुक्यातून शेकडो धरणग्रस्त व मराठवाड्यातुन हादगाव, कळमनुरी, औढा, सेनगाव, जिंतुर हिंगोली येथे बरेच धरणग्रस्त आदी उपस्थित होते.