सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक 'विल ड्युरंट' महात्मा गांधी बद्दल लिहितात, "भारताने शस्त्र हातात न घेता इतिहासातील आश्चर्यकारक व्यक्तीला आपला नेता मानले आणि एका संताने शास्त्रविना घडवून आणलेली अपूर्वक क्रांती जगाला पाहायला मिळाली".जगाला हिंसा माहित असताना महात्मा गांधीजी अहिंसेची मशाल हातात घेऊन जगाला एक नवीन मार्ग दाखविला. लोक पाहू लागली. भारतात असा एक संत आहे. ज्याच्या अंगावर ना कपडे होते,ना कोणता पद होतं, ना कसल ऐश्वर्यात, ना त्याच्याकडे पैसा, तरी हातात काठी घेत बंदूक घेतल्या इंग्रजांना हाकलुन लावलं, अहिंसेच्या शास्त्रा पुढे इंग्रजाच्या बंदुका चाल्याच नाही. गांधीजी नी जगावर प्रभाव टाकला जगाने गांधीजींच्या विचाराचे महत्त्व अधोरेखित केले.
गांधीजी चा इतिहास आणि स्वतंत्र लढा काही वेगळं लिहण्याची गरज नाही. ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. तरी महात्मा गांधीजी बदनाम कसे व का होत आहेत ? त्याचा त्याग व विचार आपल्याला समजले का ? चरख्या वरून फरणार परिवर्तनाच चाक आपणच बंद पाडल ? सहज बोलत बोलता म्हणून जातो गांधीजी मुळे अस झालं, तस झालं !
गांधीजी समजुन घेताना आपल्याला थोडं आद्यात्मिक अंगाने पाहवं लागेल, अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये अहिंसा,नैतिकता,विश्वास चे तत्वज्ञान महत्त्वचे मानले जाते. अहिंसा व,नैतिकता बद्दल विचार आपल्याला गौतम बुद्धांच्या शिकवणी दिसते, भगवान महावीर यांच्या शिकवणीत दिसते. तिचीच शिकवण महात्मा गांधीजींनी पुढे नेली. नोबल पारितोषिक विजेते 'दलाई लामा ' सांगतात, "बदल घडवून आणण्यासाठी गांधीजीने जो अहिंसेचा आधुनिक मार्ग प्रस्थापित केला त्यांच्या जीवनापासून मी शिकलो आहे". गांधीजीचा एक अध्यात्मिक अँगल (अहिंसा, विश्वास,सत्य, नैतिकता) अध्यात्मिकतेचा अर्थ मनावरील नियंत्रण, मनाचे ज्ञान असा आहे. अहिंसेचा मार्ग स्वीकारने हा आद्यत्मिक व मानसिक विकासाचा भाग आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, हिंसेला प्रतिसाद न देणे. विश्वास दाखविणे, नैतिकता असणे उदाहरणार्थ एखादाने तुम्हाला शिव्या दिल्या किंवा मारले, त्याचा तुमच्यावर प्रभाव पडला नैसर्गिक प्रवृत्ती आहे .की तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देता, पण प्रतिक्रिया न देता, तुम्ही काही न करता त्याच्याही चांगल्याची सदिच्छा करणे . साध्या माणसाचं काम नाही. यासाठी मनाची असीम स्थिरता लागले. जी सामान्य मनुष्यात ती दिसत नाही. गांधीजी असे संत होते जे एका हातात अध्यात्म आणि दुसऱ्या हातात समाज धरून पुढे जात . म्हणून गांधीजी समजणे आपल्याला अवघड गेले . आपल्याला तुलना करण्याची व त्यातून परीक्षण करण्याची सवय झाली आहे.जातीपातीत, धर्मात महापुरुषांना विभागण्याची सवय आहे .एखाद्याला चौकटीत बांधण्याची सवय आहे. तोच चष्मा डोळ्यावर चढऊन आपण नेहमी पाहत असतो.
ज्या राष्ट्रांना आपण विकसित वैचारिक समजतो त्या राष्ट्रावर गांधीजीचा प्रभाव कायम आहे. म्हणून आपल्या देशातले नेते जेव्हा बाहेर जातात. तेव्हा महात्मा गांधीजीचच नाव घेतात. "मी इंडोनेशियाला असताना मला कित्येक देशातल्या युवकांनी विचारले तुम्ही बुद्ध गांधीच्या देशातून आलात."
अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग नावाच्या व्यक्तीने गांधीजी पासून प्रेरणा घेऊन मोठा आंदोलन उभं केल. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी स्वातंत्र्याची मोठी लढाई लढली . संयुक्त राष्ट्र संघाची ग्रीन मुमेंट, त्याची प्रेरणा गांधीजींची आहे. नॉर्वे, डेन्मार्क, पोलंड या देशामध्ये गांधीजीच्या विचाराच्या आधारे आंदोलने उभी झाली. युरोपात कायदा व सामाजिक सुरक्षा या विषयावर कित्येक देशात मोठ मोठ्या परिषदा झाल्या याचा उगम महात्मा गांधीजीच्या संकल्पनेतून आहे. जगावर प्रभाव आहे हे संत भारतातील त्या संताची आणि विचारांची हत्या ही भारतात करण्यात आली. त्याच्या कार्यची, विचारांची परतफेड त्यांना गोळी घालून केली. भयंकर दुर्दैवी बाब आहे. त्या ही पलीकडे महात्मा गांधीजींना बदनाम करण्यात आले. आज युवकांमध्ये महात्मा गांधीजींनी भगतसिंग यांच्या फाशीचा विरोध केला नाही. म्हणून महात्मा गांधीजींना बदनाम करण्यात आले. पण ही चुकीची गोष्ट आहे भगतसिंग याना फाशी देऊ नका, हा युवक देशाला एक नवी दिशा देऊ शकतो आशा आशयाच पत्र त्या वेळच्या राज्यकर्त्यांना लॉर्ड आयर्विन ला लिहिलं होत. तरीसुद्धा इंग्रजांनी फाशी थांबविली नाही. दुसरा महत्त्वाचा म्हणजे सुभाष चंद्र बोस आणि गांधीजी विरुद्ध होते त्याला त्यांचा विरोध होता, असा अपप्रचार करण्यात आला. त्यांचा मार्ग तरी वेगळा असला तरी साध्य एकच होत. ते एकमेकांचा आदर करीत, चाले जावं आंदोलनात गांधीजी च्या नेतृत्व सम्पूर्ण भारत एक पाहून नेताजी खुश झाले होते. तसा त्यांनी उल्लेख ही केला आहे. नेताजींनी आपल्या तीन ब्रिगेड चा नाव गांधी,नेहरु,आझाद, ठेवले होते. गांधीजीनी ही बोस याच्या बद्दल चांगलेच मत होते. ते लिहितात, 'सुभाष चंद्र बोस यांनी जपानला जाऊन सर्व जाती धर्मातील लोकांची एक मोठी फौज तयार केली आणि मोठ्या ब्रिटिश हुकूमतला ते टक्कर देत आहेत" असे संबंध महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस याचे होते. बाबासाहेब आणि गांधी बद्दलही तसंच . प्रचार झाला तिथे गांधीजी बदनाम झाले. पण आम्ही हे समजू शकलो नाही. की ते आपापल्या,वेगवेगळ्या उद्दिष्टपूर्ती करिता आपल्या मार्गाने लढत होते . त्यांची तुलना होऊ शकत नाही. कोणी महान किंवा लहान अस होत नाही. त्यांचं महत्त्व आपापल्या ठिकाणी कायम आहे. आता प्रश्न उजव्या संघटना बद्दल, महात्मा गांधी जेव्हा राजकारणात आले आणि प्रस्थापिताच्या हातातलं नेत्रुत्व गेलं. काँग्रेसची दारं सर्वांसाठी उघडी झाली.काँग्रेस भारतभर पोचली. प्रस्थापितांच्या हातातून काँग्रेसचा घसरता नेतृत्व पाहता त्यांच्या नाराजी होती,सर्व जाती धर्मातील लोकांना गांधीजी जवळ करीत होते. देशाची फाळणी झाली, त्यांचा रोष गांधीजीवर उसळला. म्हणून त्यांनी सुद्धा गांधीजींचा भयंकर अश्लील असा अपप्रचार केल्याच दिसते. फाळणी कोणी समर्थन करत नाही मग देशात यादवी हवी होती का ? युद्ध पाहिजे होतं का हा प्रश्न येतो. या बाबी लक्षात घेण्या सारख्या आहे. गांधीजींनी एका वर्गाकरिता काम केले नाही, धर्मा करिता केले नाही, कार्य सर्व भारतीयांकरिता कार्य केले.सर्व देशांचा विचार करीत असताना सर्वांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. सोबतच गांधीजी च्या विचारणे चालणारे पक्ष, संघटना हे गांधीजींचे खरे विचार पोहोचवण्यात असमर्थ राहिले. (गांधीजीच्या विचारांना रोखणं शक्य होत नाही, गांधी नावाच्या आंधी रोखण शक्य होत नाही हे लक्षात आल्यावर सरळ त्यांचा खूनच करून टाकला) पण खून केल्यावर सुद्धा गांधीजींचे विचार काही मेले नाहीत. वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून आणि व्यक्तींच्या माध्यमातून जगभर जिवंत राहिलेत. फरक फक्त एवढाच आपण त्यांना समजू शकलो नाही.आता संकुचित दृष्टिकोन सोडून सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाणं महत्त्वाचं.एखाद्या मूर्तीवर वादळ वाऱ्याचा, पाऊस व्हावा की मूर्ती धुऊन निघावी आणि पुन्हा प्रखर चमकायला लागावी त्याप्रमाणे गांधीजीचे विचार आजही चमकत आहे.
संदीप गोहोकार, वणी
संपर्क : 7350006276
राष्ट्रपिता बापूंना समजून घेताना.....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2023
Rating:
