सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज सोमवार दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील राबविण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक साहेब डॉ. सुभाष इंगळे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी रुग्णालयातील इन्चार्ज सिस्टर निता कोवे, डॉ. जवादे मॅडम, डॉ. नागभीडकर सर, डॉ. अश्विन सर, डॉ. राजेश सर, खामनकर सर, तावडे सर, कल्याणकर सर, रामटेके सर, जयश्री इंगोले, प्रणाली राऊत, भाग्यश्री सवाई, रेवती गोचडे, नेहा मेंगेवार, प्रीती कुळसंगे, कायसी साखरे, योगिता कुकुर्डे, पूजा सौदे, संगीता वैद्य, माधुरी ब्राह्मणे, सुरेश लिहितकर, सागर चिंडाले, रंजीत मडावी, संतोष सारवान, राजकिरण राठोड, अनंता पाचपोहर, मनोज चिंचुलकर, यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2023
Rating:
