सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शहरातील टिळक चौक ते खाती चौक या मुख्य मार्गावर असलेल्या माळीपूरा येथे पंकज बन्सीलाल भंडारी (47) यांचे फर्निचरचे दुकान आहे. ते 2006 पासून तिथे आपला व्यवसाय करीत आहे. सदर दुकाना पैकी काही भाग हे समीर रंगरेज यांनी लुलेकर यांचे कडून विकत घेतले असून याबाबत ताबा मिळण्याबाबत न्यायालयात केस सुरू असल्याची माहिती आहे. याकरिता अनेकदा पंकज याला दुकान खाली करण्याबाबत धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तेव्हा पंकज भंडारी यांनी न्यायालयाचा जो निर्णय येईल तो मान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी समीर रंगरेज यांनी बुधवारी दिनांक 11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पंकज भंडारी यांचे दुकान हे जेसीबी मशीनने तोडले त्यामुळे पंकज भंडारी यांनी दुकानातील 1 लाख 20 हजार नगदी व 50 हजराचे सामान व दुकानाचे 18 लाख असे एकूण 19 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी समिर परवेज रफीक रंगरेज विरुद्ध भादंविच्या कलम 457, 380, 427 नुसार गुन्हे दाखल केले.
समीरने मात्र, स्वतः सकाळी 6 वाजता पोलीस ठाण्यात जावून एक लेखीपत्र देवून दुकान पाडल्याची कबुली सहिनिशा दिल्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करताना कुठलीच अडचण आली नाही. विशेष उल्लेखनीय की, या जागे बाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने कायदा हातात घेऊन, गुंडप्रवृत्तीने जेसीबि (jcb) लावून सदर दुकान तोडल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून, असली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
बुधवारी रात्री दुकान तोडल्याने रस्त्याच्या बाजूला टिना ठोकण्याचे काम गुरुवारी सुरू असताना तिथे काही महिलांनी येवून पंकज भंडारी सोबत वाद घातला, घाबरलेल्या पंकजने पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देत स्वतःच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पोलिस सुरक्षेची मागणी केली.
खळबळजनक...मध्यरात्री फर्निचर दुकान जमीनदोस्त, लाखोंचे नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2023
Rating: