सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : 11 आक्टोबर रोजी म.रा.किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा व भारतिय कम्युनिस्ट पक्षाचा केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात कॉ. अनिल हेपट, भाकपचे जिल्हा सचिव कॉ. अनिल घाटे व कॉ. बंडू गोलर यांच्या नेत्रुत्वात प्रचंड मोर्चा वणी येथे काढण्यात आला, मोर्चा शहरातील मुख्य मागाने फिरून तहसील कार्यालयावर धडकला व शासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने खवडी करण्याचा निर्णय मागे घेऊन संपूर्ण कापूस खरेदी करण्यात यावा, शेती मालाचे भाव पाडणे बंद करावे, आयात निर्यात धोरणात अवाजवी हस्तक्षेप बंद करावा, हमीभावाचा कायदा करावा, पैसा नको धान्यच द्या जुनी धान्य योजना नियमित सुरु ठेवावी, अतिक्रमणधारक शेतकऱ्यावर शेतीवरून हुसकावणे लावणे बंद करा, त्वरीत कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे, वाढती महागाई कमी करण्यात यावी, कंत्राटी पध्दतीने नौकर भरती बंद करावी व कायम स्वरुपाची नौकर भरती करावी, सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करा, सरकारी उद्योगाचे, बँक, दवाखाने, शेतीचे खाजगीकरण बंद करावे. धार्मिक कार्यक्रमात ध्वनीनियत्रांची सक्ती करावी, पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांचे शेत धोक्यात आल्याने पिक विम्याचे योग्य सर्वे करून विमा क्लेम देण्यात यावा, सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅक (Yellow Mosaic) मोठ्या प्रमाणात आल्यामुळे संपूर्ण सोयाबीन पिक आताचे गेले आहे त्यामुळे सर्वे करून मदत करावी. या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या मोर्चामध्ये धनंजय आंबटकर, वासुदेव गोहणे, दिलीप लांजेवार, उत्तम गेडाम, रोहन देठे, नितेश तुराणकर, पंढरी मोहीतकर, रामदास पखाले, चंदु पोतराजे, हरिचंद्र तुराणकर, पांडुरंग पिंपळशेंडे, सुनील गेडाम, राकेश खामनकर,अथर्व निवडिंग, डॉ. तांबेकर, लता रामटेके, पुंडलिक डुमणे, प्रमोद पहूरकर, शंकर केमेकर, पांडुरंग ठावरी, एकनाथ रायसिडाम, प्रवीण रोगे, यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वणीत संयुक्त किसान मोर्चा व भाकपचा प्रचंड मोर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2023
Rating: