टॉप बातम्या

रेती तस्करावर धडक कारवाई; तहसीलदार निलावाडांनी केले 3 ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करुन देणे व अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने शासनाने रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाईन प्रणालीव्दारे नवीन वाळू धोरण शासनाने जाहीर केले आहे. तरी देखील मारेगाव तालुक्यातील रेती तस्करी थांबलेली नाही, असे पुन्हा या कारवाईने अधोरेखित होतेय. काल मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या धडाकेबाज कारवाईने 3 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली.

तहसीलदार सह पथकाने रात्रीच्या काळोखात रात्रभर या शिवारात बस्थान मांडत चिंचमंडळ येथील रेती भरलेले 3 ट्रॅक्टर वर छापा टाकून वैभव भास्कर सोनटक्के, अनिकेत कमलाकर झाडे, शुभम भास्कर पालकर यांच्या मालकीचे वाहन जप्त केले. या धडक कारवाईने तालुक्यातील रेती तस्करी पुन्हा उजागर झाली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

विशेष उल्लेखनीय की, कोसारा घाटातून रेतीसह पाच ट्रॅक्टर घेवून निघाले. दरम्यान, रेतीसह भरलेले चिंचमंडळ येथील तब्बल पाच ट्रॅक्टर तस्करावर धाड टाकताच पाच पैकी दोन ट्रॅक्टर चालकासह पसार झाले. मात्र, तीन ट्रॅक्टर तहसीलदार यांच्या पथकाने जप्तीची कारवाई करित सदर तीन ट्रॅक्टर रेतीसह भरलेले तहसील कार्यालयात जमा केले.


मारेगाव तालुक्यातील रेती तस्करी ही सुपरिचित आहे. त्यात कोसारा, शिवणी, चिंचमंडळ, दापोरा, कोथुर्ला, खैरी, हे मुख्य केंद्र बनलेलेले असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी जोमात आहे. त्यामुळे शासनाचे रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन कुचकामी ठरतंय असे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
Previous Post Next Post