सात दिवसात उपाययोजना करा अन्यथा...तालुका काँग्रेस कमिटीचा खदान व्यवस्थापकांना ईशारा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : वणी-मारेगाव या राज्य महामार्गांवरील असलेल्या गौराळा चुनखडी खदानीतून चुनखडी ओव्हरलोडिंग वाहतूक वाहनांमुळे खदानी नजीक महामार्गांवर चिखल साचल्याने याठिकाणी अपघात घडत आहे. अशा आशयचे निवेदन वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक व्यवस्थापक चुनखडी यांना देण्यात आले.

मारेगाव-वणी राज्य महार्गावर गौराळा चुनखडी खदानीतून टिप्पर ओव्हरलोड चुनखडी भरून भरधाव वाहतात. मात्र, त्या वाहनावर ताडपत्री वरुण झाकल्या जात नाही, परिणामी प्रवाशांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गांवर सुकलेल्या मातीच्या रेतीच्या कनामुळे वाहने चालवणे मोठे जिकरीचे झाले असून, वाहन धारकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन आज गुरुवार दि.5 ऑक्टोबर ला संबंधित व्यवस्थापकाला नमूद समस्या दूर करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. येत्या 7 दिवसात उपाययोजना न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल,असा निवेदनातून गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. 

सदर निवेदन काँग्रेसचे नेते माजी आमदार वामनराव  कासावार यांचे मार्गदर्शनात व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकारी, गावकऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, जिल्हा उपाध्यक्ष, अफसर शेख अल्पसंख्याक विभाग, माजी सरपंच रामदास कुचनकर, संतोष गोवरदिपे, अ‍ॅड. सूरज महारतळे, मारोती सकीनकर, गणेश बावणे, रवींद्र वाघाडे, रोशन घागी, स्वप्नील चिंचोळकर, नागेश टेकाम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
सात दिवसात उपाययोजना करा अन्यथा...तालुका काँग्रेस कमिटीचा खदान व्यवस्थापकांना ईशारा सात दिवसात उपाययोजना करा अन्यथा...तालुका काँग्रेस कमिटीचा खदान व्यवस्थापकांना ईशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.