सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : नव्या कार्यकर्त्यांना संधी देत मारेगाव तालुक्याचे नवीन चित्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
'विषय गंभीर तिथे मनसे खंबीर' युवकांच्या हाताला काम नाही, आणि म्हणून वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार महोत्सवासाठी मारेगाव तालुक्यातील गावागावात आणि युवा बेरोजगारांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता मनसेची (ता.3) ला मारेगाव येथील शासकीय विश्रामगृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,"प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा" हे जनतेला चांगल माहिती आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सर्व सामान्य, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक, विद्यार्थी यांच्या समस्याना नेहमीच वाचा फोडण्याचं काम करित असते. आणि करत राहणार,आता पक्षाच्या वतीने भव्य रोजगार महोत्सव आमचे नेते राजू भाऊ यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या बैठकीला रोजगार महोत्सवाची माहिती, माहिती पत्रके, अर्ज व संबंधित प्रचार प्रसार साहित्य देऊन यासंबधी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, संघटक प्रमुख नबी शेख, ता. उपाध्यक्ष उदय खिरटकर, मनविसे ता अध्यक्ष लाभेश खाडे, महिला शहराध्यक्ष सिंधुताई बेसकर, आशिष खंडाळकर, अजय वासेकर, कुंभा विभाग प्रमुख आदित्य बुचे, मार्डी विभाग प्रमुख रोहित हस्ते, संतोष राठोड, यांच्या सह मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मारेगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहात बैठक संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2023
Rating:
