मारेगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
 
मारेगाव : अधिकाराचा व पदांचा दुरुपयोग करून बोगस बंगाली डॉक्टरांना "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" समजुन चिरीमीरी पोटी पाठीशी घालणाऱ्या मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा तक्रारीसह निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार निलावाड यांच्या मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांना देण्यात आले.

मारेगाव शहरासह तालुक्यातील मार्डी, नवरगांव, कुंभा बोटोणी, चिंचाळा, रोहपट, चिंचमंडळ यासह अनेक गाव खेडयात डॉक्टरकीचा गोरखधंदा चालविणाऱ्यांकडून जनतेची व गरीब रुग्णांची लूट सुरु आहे. याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे सफसेल दुर्लक्ष असल्याचा आरोप मनसे कडून केला जात असून आरोग्य विभागाच्या नाकावर टिचून चिरीमिरीच्या लालसे पोटी हे सर्व बस्थान मांडून बसलेले बोगस डॉक्टरांचे जाळे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे.

दरम्यान, मारेगाव तालुका प्रशासनाने ही गंभीर बाब हेरून त्यांच्यावर छापा टाकण्याची गरज निर्माण झाली असताना या बोगस डॉक्टराकडून हात ओले होत असल्यामुळे थाटलेली बोगस दवाखाने कायम बंद न करता राजरोसपणे सुरु आहेत. अशांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर व बोगस डॉक्टरावर ताबडतोब कारवाई करावी, अशा आशयाची तक्रार यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, व मुख्याधिकारी यांना करण्यात आली आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष चांद बहादे, नगरसेवक अनिल गेडाम, विलास रायपुरे, गजू भाऊ चंदनखेडे, नवी शेख, आकाश खामनकर, जमीर सय्यद, ईशान दारुंडे आदी उपस्थित होते. 


"मारेगाव तालुक्यात सुरु असलेल्या बोगस गोरखधंद्यावर लगाम न लागल्यास लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून थेट स्टिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी "सह्याद्री चौफेर" बोलताना माहिती दिली.
मारेगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा मारेगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.