धनगर समाजाचे एक दिवशीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी, तसा शासकीय अध्यादेश काढुन धनगर समाजाला एस.टी. प्रमाणपत्राचे वितरण करण्यात यावे अशा आशयचे निवेदन तहसीलदार निलावाड यांना देण्यात आले.
धनगर समाज आरक्षण कृती समिती च्या वतीने आज (ता.5) ला एक दिवशीय धरणे आंदोलन मारेगाव तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने धनगर आरक्षणाची मागणी गेल्या ७० वर्षापासून प्रलंबित आहे. परंतू शासन दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आज एक दिवशीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजातील अनेक कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी भूमिका विषद केली. अशा कुटुंबातील मुला मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धनगर समाजातील विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाची अभ्यासिकेची व निवासाची व्यवस्था शासनाने मोफत करावी, पुणे येथील हा प्रस्तावित जागेवर निवासाचे बांधकाम करण्यात यावे, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच द्वारे मुंबई उच्च न्यायालय केस क्र. ४९१९/२०१७ दाखल असून ती केस त्वरीत फास्ट ट्रकवर चालवावी तसेच सदर केस अंतीम सुनावणी करीता ज्या बेंचसमोर चालु होती त्याच समोर चालविण्यात यावी तसेच सदर केसमध्ये आतापर्यंत जे सरकारी होते त्यांना मागील सुनावणीच्या वेळी सरकारने ऐन वेळी बदलून केस प्रलंबित कशी राहिल असे वर्तन केले. त्यामुळे सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे धनगर समाजाची पीछेहाट झाली असून याला सरकार जबाबदार आहे. अशी तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात पुढे असेही नमूद आहे की, धनगरांच्या उपजीवीकेचा मुख्य व्यवसाय मेंढीपालन आहे. त्यामुळे धनगर मेंढपाळ यांना सरकारी चराई क्षेत्र शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे, तसेच शेळी मेंढीचा एक रुपयात विमा शासनाने काढुन द्यावा, धनगर मेंढपाळ बांधवावर गावगुंड,प्रस्थापीत मंडळी, वनविभाग यांच्याकडून झालेल्या वेळोवेळी हल्ला प्रकरणाची दखल घेवून दोषींवर योग्य कार्यवाही करावी, तसेच धनगर समाजाला एस.टी. प्रमाणपत्राचे वितरण करण्यात यावे, शासनाने धनगर समाजाच्या घटनात्मक मागण्या मान्य करून दुर्लक्षित समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी आज एक दिवशीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आले. 

दरम्यान, धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या आगामी निवडणूका सरकारच्या विरोधात मतदान करण्यात येईल, असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनास तालुक्यातील सर्व धनगर समाज आपल्या न्याय हक्कासाठी एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले.
धनगर समाजाचे एक दिवशीय धरणे आंदोलन धनगर समाजाचे एक दिवशीय धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.