सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मानव विकास कार्यक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान अंतर्गत अन्नपूर्णा महिला स्वयंसाहाय्य समूह कोलगाव च्या वतीने हळद प्रक्रिया उद्योग सुरु करण्यात आला. त्या उद्योगाचा स्टॉल मंगळवारला मारेगाव येथे लावण्यात आला, त्या स्टॉलचे उदघाटन पंचायत समिती चे गट विकास अधिकारी मा श्री पद्माकर मडावी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी अन्नपूर्णा महिला स्वयंसाहाय्य समूह अध्यक्ष सौ सविता नागरकर, सचिव सौ रूपाली गारघाटे, सौ कविता धाबेकर (ICRP), सदस्य सौ अनिता सोनटक्के, सौ सुशीला पिंपळकर, सौ निर्मला नागरकर, श्रीमती सारिका ठेंगळे, श्रीमती विमल लांबट, सौ शकुंतला थेरे, सौ सिंधू लोडे, तालुका अभियान कक्षाचे व्यवस्थापक विठ्ठल आत्राम, गायकवाड मॅडम, काकडे सर, टाले सर, पेंदोर सर, मोहितकर मॅडम, शंभरकर सर, सुधाकर जाधव (विअ), भैय्याजी कनाके, कुमार अमोल, भगवान धाबेकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री मडावी गविअ यांनी उद्योगाला मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.यावेळी उद्योग समुहाच्या मान्यवरांनी उपस्थितांचे आभार मानले.
गट विकास अधिकारी पद्माकर मडावी यांचे हस्ते हळद प्रक्रिया उद्योग स्टॉल चे उदघाटन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 12, 2023
Rating: