मनसेचा दणका : बोगस डॉक्टरावर धाड; सुगावा लागताच "तो" डॉक्टर फरार


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शहरासह ग्रामीण भागात सध्या विविध आजाराने थैमान घातले आहे. याचा फायदा बोगस डॉक्टर घेत असून महागडा उपचार न परवडणाऱ्या सामान्य रुग्णाची होणारी आर्थिक लूट व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकारी यांचे वर कारवाई करा,अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना केली होती. या तक्रारीची दखल घेत आरोग्य विभाग पथकांनी काल (11 ऑक्टो.) रोजी तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारत मारेगावातील एका बंगाली डॉक्टरवर धाड टाकून कारवाई करण्यात आली, मात्र, सदर बोगस डॉक्टराने आपल्या दवाखान्यातून आधीच पोबारा केल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव शाखेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक, मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना तालुक्यातील बोगस डॉक्टर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वर कारवाई करा अशी त्यांची मागणी होती. गेल्या काही वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी आपलं बस्थान मांडून सर्व सामान्य रुग्णाच्या जीवाशी खेळ खेळणे सुरु केला आहे, यात तालुका आरोग्य अधिकारी हात ओले करित पाठीशी घालत आहे, असा थेट आरोप मनसे चे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी निवेदनातून केला होता. अशा बोगसांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली होती. जर कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले तर मनसेच्या वतीने 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात येईल असा ईशारा बहादे यांनी दिला असता याचा धसका घेत तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने मारेगावातील एका दास नावाच्या बंगाली डॉक्टरवर धडक कारवाई केली. मात्र,आपल्या वर दणका असल्याचा आधीच त्याला सुगावा लागल्याने डॉक्टराने पोबारा केले अशी माहिती आहे. 
      
मारेगाव तालुक्यात डेंगू, मलेरिया यासारखे आजाराचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे सरकारी तथा खाजगी दवाखाने तुडुंब असताना बोगस डॉक्टरांकडून सामान्य रुग्णाची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभागाच्या वतीने मारेगाव येथील घोन्सा रोड स्थित डॉ. नित्यानंद दास या बंगाली डॉक्टराच्या दवाखान्यावर धाड टाकली. यादरम्यान 80 प्रकारच्या ऍलिओपॅथीक औषधी आढळून आल्याचे मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी सांगितले. मात्र, आपल्या वर कारवाई चा बडगा उगारला जाणार या धसक्याने आधीच सुगावा लागलेल्या या बोगस बंगाली डॉक्टरांने पळता वाट केल्याचे समजते. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आल्याचेही समजते.

कारवाई दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अर्चना देठे, गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, विस्तार अधिकारी पी. एस. माने, एस. एन. जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी महल्ले, आरोग्य सहाय्यक कोकाटे, आरोग्य सेवक राऊत, कोलूरे हे उपस्थित होते.
मनसेचा दणका : बोगस डॉक्टरावर धाड; सुगावा लागताच "तो" डॉक्टर फरार मनसेचा दणका : बोगस डॉक्टरावर धाड; सुगावा लागताच "तो" डॉक्टर फरार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.