पिसगांव ते पहापळ मार्गाचे होणार नूतनीकरण; भैय्याजी कनाके यांच्या मागणीला यश


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागातील काही रस्त्याची दयनीय अवस्था आहे, त्यामुळे वाहन चालकांसह पादचारी प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशीच काहीशी स्थिती पहापळ ते पिसगांव रस्त्यांची झाला असून,मार्ग मोठ्या प्रमाणावर खड्ड्याच्या विळख्यात सापडल्याने खड्ड्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला करावा लागत असून रस्त्यावरील अंतरा अंतरावर मोठे खड्डे पडले आहे.

पहापळ ते पिसगांव हा रस्ता व्हावा यासाठी पेसा कोष समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके व ग्रा.पं.सदस्य हरिभाऊ ठाकरे यांनी दि.18-01-2023 ला या मार्गासाठी संबंधित विभागाला रीतसर पत्र व्यवहार करून मागणी केली होती. त्यात त्यांनी पहापळ ते पिसगाव रस्त्याची झालेली चाळण, खड्डे याची डागडुग्गी व रस्ता वहीवाट योग्य दुरुस्ती तसेच या मार्गांवरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी प्रमुख मागणी केली होती. आता या मागणीला नऊ महिने होऊन दहावा महिना लागला आहे. दरम्यान, दुसऱ्यांदा त्यांनी संबंधित विभागाला पत्र व्यवहार केला आणि अखेर पिसगांव ते पहापळ रस्ता व पुलाचे बांधकाम मंजूर करून घेतले. सण 2023 या मार्च अर्थसंकल्पातून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या पाठपुराव्याने सदर रस्त्याला निधी उपलब्ध करून दिला.

मारेगाव तालुक्यातील काही भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती बनली असल्याने नागरिकांबरोबर वाहन चालकामध्ये कमालीचा संताप व्यक्त होत दररोज कुठेना कुठे तरी छोटे मोठे अपघात घडत असून, दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील खड्डे व नादुरुस्त मोठ्या वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला अनेक शारीरिक आजार होत असून काहीना कंबरदुखी, मानदुखी असे आजार जडत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

पहापळ ते पिसगांव या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या मार्गावरुन अनेक शाळकरी विद्यार्थी व नागरिक, शेतकरी, कर्मचारी दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असल्यामुळे या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन मोटार सायकल चालकाच्या गाड्या या रस्त्यावरून घसरून वाहन चालकांना दुखापत होत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. परिणामी स्थानिक पदाधिकारी काय करत आहे, असा सवालही उपस्थित होत होता. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी भैय्याजी कनाके व हरिभाऊ ठाकरे यांनी लावून धरली आणि अखेर या मार्गाला मंजुरी मिळाली, तसे संबंधित विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून त्यांना लगेचच या मार्गाचे काम सुरु होईल अशी ग्वाही उपअभियंता आसुटकर, (मारेगाव) यांनी दिली आहे. भैय्याजी कनाके व हरिभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले असून त्यांच्या कार्यप्रणाली वर ग्रामस्थ फार उत्साहित आहेत. आता ताबडतोब पिसगाव ते पहापळ मार्गाचे काम सुरु व्हावे याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.


"हे यश माझे नसून सर्व गावाकऱ्यांचे आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मी हे करू शकलो. यासाठी हरिभाऊ, सदस्य साधनाताई मोहितकर, सदस्य चंदाताई गेडाम यांनी वेळोवेळी साथ दिली तसेच गावातील सर्व समित्याचेही विशेष सहकार्य लाभले, विशेष म्हणजे आपल्या वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यांचे सुद्धा मी आणि गावाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो".

-भैय्याजी अंबादास कनाके
पेसा कोष समिती अध्यक्ष, तथा ग्रामपंचायत सदस्य,पहापळ, (पं स मारेगाव)
पिसगांव ते पहापळ मार्गाचे होणार नूतनीकरण; भैय्याजी कनाके यांच्या मागणीला यश पिसगांव ते पहापळ मार्गाचे होणार नूतनीकरण; भैय्याजी कनाके यांच्या मागणीला यश Reviewed by सह्याद्री चौफेर on October 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.