सभापती गौरीशंकर खुराणा 'त्या' मृतक वृद्ध महिलेच्या मदतीला सरसावले

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : काल दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोज शनिवारला मारेगाव नगर पंचायतच्या प्रांगणातील पायरीवर एका वृद्ध महिलेचे प्राणज्योत मालवली. या प्रेताची ओळख पाठविण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले असता, ही माहिती मिळताच 'त्या' अनोळखी प्रेताच्या मदतीला कृ उ बा समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा मदतीला सरसावले आहे. 
या अनोळखी मृतक महिलेचे अंदाजे 65 वय वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ताफा नगर पंचायत मध्ये दाखल होऊन सदर घटनेची माहिती जाणून घेतली व जनहितच्या संघटनेच्या माध्यमातून त्या वृद्ध महिलेचे प्रेत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात स्वतः दाखल केले. या अज्ञात वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे चक्र जलद गतीने फिरवले असता काही वेळातच सदर मृतक महिला नकोडा येथील असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांना दूरध्वनी वरून प्राप्त झाल्याची माहिती मारेगाव ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आली.
सदर वृद्ध महिलेची प्रेत ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनाकरिता ठेवण्यात आले. मृतक वृद्ध महिलेच्या घराची परिस्थिती बिकट असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आल्याने परिस्थितीची जाणीव करत सभापती यांच्या वतीने मृतक वृद्ध महिलेचा मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती जनहित कल्याण संघटनेचे कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून दिली.

यावेळी प्रेत रुग्णालयात दाखल करताना सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या सह जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
सभापती गौरीशंकर खुराणा 'त्या' मृतक वृद्ध महिलेच्या मदतीला सरसावले सभापती गौरीशंकर खुराणा 'त्या' मृतक वृद्ध महिलेच्या मदतीला सरसावले Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.