पठारपूर येथील तरुणाने घेतला गळाफास

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना. मागील काही दिवसापासून आत्महत्येची जणू काही मालिकाच सुरु असून आज पुन्हा एका युवकाने कायर परिसरात गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना सकाळी उघडकीस आली.
शंकर तुकाराम मंगाम (वय अंदाजे 24) रा.पठारपुर असे गळाफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने कायर येथिल ग.क्र. 196 मधिल ले-आऊट मधिल लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आज दि.15 ऑक्टोबर रोजी सकाळी 5:00 वा. सुमारास आपली जीवन यात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या दुःखद घटनेने पठारपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

त्याच्या पाठीमागे वडील तुकाराम गोविंदा मंगाम (57), आई मीना तुकाराम मंगाम (50), असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
पठारपूर येथील तरुणाने घेतला गळाफास पठारपूर येथील तरुणाने घेतला गळाफास Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.