सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : गेल्या एका महिन्यापासून ग्रामपंचायत गोंडबुरांड येथील बनावट कारभार चर्चेत असून त्यास स्थानिक प्रशासनाकडून हसण्यावारी घेतला जात आहे. मात्र, तो सर्व प्रकार उघड करण्यासाठी आजपासून गोंडबुरांडा येथील नागरिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत गोंडबुरांडा येथे दि.५/६/२०२३ ची खोटी ग्रामसभा, बनावट ठराव घेवुन एका गैरआदिवासी महिलेची आशा सेविका म्हणून निवड केली. पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे तिथे प्रथम प्राधान्य आदिवासी उमेदवाराला असते, असा पेसा कायदा सांगते. (आमच्या गावात आम्ही सरकार) हा आदिवासी लोकांचा स्वयंशासनाचा सर्वोच्च कायदा असून पेसा कायद्याचे उलंघन करून येथील संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, करीत आहे. अशी तक्रार स्थानिक नागरिक अर्जुन आत्राम, बाली आत्राम, सागर आत्राम व प्रविणा आत्राम यांनी जिल्हा वरिष्ठाकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. या संदर्भात पंचायत समिती गटविकास अधिकारी, मारेगांव यांना वारंवार निवेदन देवून सुध्दा यांनी साफ दुर्लक्ष केले आहे, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. यवतमाळ येथे जाऊन सर्व उपोषण कर्ते यांनी मुख्य अधिकारी, यांचेकडे या खोट्या आशा निवड प्रक्रिया बाबत निवेदन दिले व स्वतः त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. तरी सुध्दा आजतागायत या आदिवासी लोकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आज दि.15 ऑक्टोबर रोज रविवारपासून लोकशाही मार्गाने पंचायत समिती मारेगांव कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
मारेगाव तालुका आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो, याच तालुक्यात खऱ्या आदिवासीना डावलून, त्याच्या हक्काच्या जागेपासून वंचित ठेवण्याचे काम येथील स्थानिक प्रशासन करित असून गैर आदिवासीना पाठीशी घालण्याचा सावळा गोंधळ तालुकास्तरावरून सुरु असल्याची ओरड आदिवासी बांधवाकडून होत आहे. त्यामुळे महामहिम राष्ट्र्पती, आदिवासी मंत्री, जिल्हा संबंधित विभाग याकडे लक्ष देण्याची आग्रही मागणी आता तालुक्यातील आदिवासी जनता करत आहे. तूर्तास या आमरण उपोषणाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका शाखा मारेगाव, ग्राहक प्रहार संघटना, शाखा मारेगाव, भाकप, यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
आजपासून गोंडबुरांडा येथील नागरिकांचे आमरण उपोषण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2023
Rating: