उद्याच्या केळापूर येथील श्री जगदंबेची आरतीचा मिळाला किशोर जुनेजा यांना मान


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : यंदाच्या केळापूर येथील श्री जगदंबेची आरतीचा मान मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 6 मधील रहिवाशी असलेले व्यावसायिक किशोर जुनेजा यांना मिळाला. उद्याच्या सकाळची किशोर जुनेजा यांच्या हस्ते श्री जगदंबा मातेची आरती होणार आहे.
मारेगाव-मार्डी येथील सुपरिचित किराणा व्यावसायिक किशोर जुनेजा यांनी स्वत: ही अधिकृत माहिती दिली असून पहाटेला होणाऱ्या आरतीला सहकुटुंब सहपरिवार जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
 
दरवर्षी प्रमाणे येथील पहाटे 5. वाजताच्या केळापूर श्री जगदंबेची आरती करणाऱ्या भाविकांची 'ड्रॉ' द्वारे निवड करण्यात येते. किशोर जुनेजा परिवार हे गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून जगदंबा मातेचे श्रद्धापूर्वक भाविक म्हणून दर्शन घेतात, त्याच सोबत ते या श्री जगदंबा संस्थान, नवरात्रोत्सव आरती निवडीकरिता मोठ्या श्रद्धेने योजनेतील सहभागाकरिता पावती स्वीकारतात, दरम्यान त्यांना हा कधी योग आला नाही, किंबहुना आरतीचा हा मान मिळाला नाही.
असे त्यांनी 'सह्याद्री चौफेर' बोलताना सांगितले. मात्र, येथील संस्थानचे दर्शन ते मनोभावे दरवर्षी सहपरिवारांच्या उपस्थितीत घेतात.
विशेष म्हणजे कुठल्याही आरतीसाठी खास पाहुणे निमंत्रित केले जातात हे आपण बघतोय, परंतु अशा परंपरेला बगल देत सर्वाना या आरतीचा मान मिळावा अशी येथील संस्थानच्या वतीने योजना तयार करण्यात आली, आणि या योजनेमध्ये यंदाच्या आरतीचा बहुमान मारेगाव येथील किशोर जुनेजा यांना मिळाला आहे. त्यामुळे जुनेजा परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून श्री जगदंबा मातेची कृपा झाली, जय माता दी चा जयजयकार हो...उद्या सकाळच्या आरती करिता दिपक जुनेजा, पूजा जुनेजा, महेश जुनेजा, साक्षी जुनेजा, रितिका जुनेजा व पियू असे सर्व उपस्थित असणार आहेत.
श्री जगदंबेची आरती करणाऱ्या भविकांची नाव पुढीलप्रमाणे :
16 ऑक्टोबरला सकाळची आरती किशारे जुनेजा (मारेगाव), सायंकाळी आरती विनोद भाऊराव कैटिकवार (पांढरकवडा), 17 ला सकाळी राज आतिश बरदीया (पांढरकवडा), सायंकाळी गजानन वैद्य (वाईबाजार), 18 ला सकाळी पूनम अभिजित बोरेले (पांढरकवडा), सायंकाळी बापू पारशिवे (केळापूर), 19 ला सकाळी सचिन सुभाष शिरोली, सायंकाळी शौर्य मनीष गंपावार (यवतमाळ), 20 ला सकाळी शोभा बोधनवार (चालबर्डी), सायंकाळी दिगांबर भोयर (पांढरकवडा), 21 ल सकाळी सागर सुधाकर वातीले (घाटंजी), सायंकाळी ओम शैलेंद्र रॉय (अमरावती), 22 ला सकाळी विभा भुप्त (पांढरकवडा), सायंकाळी नवी गुम्मडवार (सुर्दापूर), 23 ला सकाळ उत्तम काशिनाथ हांडे (वणी) यांच्या हस्ते आरती होणार आहे.
सकाळची आरती झाल्यानंत घुगरीचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच अध्यक्षांच्या हस्ते घट विसर्जन करण्यात येणार आहे. सकाळच आरती 5 वाजून 5 मिनिटांनी त संध्याकाळची आरती 7 वाजून मिनिटांनी सुरू होणार आहे.
उद्याच्या केळापूर येथील श्री जगदंबेची आरतीचा मिळाला किशोर जुनेजा यांना मान उद्याच्या केळापूर येथील श्री जगदंबेची आरतीचा मिळाला किशोर जुनेजा यांना मान Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.