सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली, सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम विद्यमान सरकार करित असल्याने आदिवासी विरोध मुख्यमंत्री शिंदे सरकारचा निषेध आणि धनगर यांना आदिवासी समाजात समाविष्ट करू नये, पेसा कायदा अधिक कडक करण्यात यावा,यासाठी मारेगावात ३ ऑक्टोबर रोजी भव्य 'आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष' आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३ ऑक्टोबर २०२३ रोज मंगळवारला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथे सकाळी १० वाजता सर्वांनी हजर राहावे, त्या नंतर आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला मा. श्री लेतुजी जुनगरे (केंद्रीय अध्यक्ष शा. को. संघटना, मारेगाव), मा श्री. गीत घोष (राष्ट्रीय अध्यक्ष सं.ह.प.महाराष्ट्र), मा. श्री.अरविंद कुळमेथे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बिरसा ब्रिगेड, यवतमाळ), मा श्री.बळवंत मडावी (प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांचे मार्गदर्शन करणार आहे.
अनुसूचित जमातीच्या (एस टी) आरक्षणाला धक्का लागल्यास सर्व समाज बांधव त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, हक्कासाठी धक्का दिला जाईल. हे सरकारने लक्षात घ्यावं, असा सूचक ईशारा आदिवासी बांधवाकडून देण्यात येत आहे.
मंगळवारी मारेगाव येथे होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सर्व आदिवासी बांधवानी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे, जाहीर आवाहन सर्व पक्षीय आदिवासी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेमध्ये असणारे नेते, व महिला पुरुष, युवक युवती तथा आदिवासी समाज बांधवाना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
चलो मारेगाव: आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष आक्रोश मोर्चा...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2023
Rating:
