Top News

स्वच्छता पंधरवाडा उपक्रमांतर्गत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात 'एक तारीख, एक तास श्रमदान' उपक्रम संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि. रविवार १ ऑक्टोबर रोजी मारेगाव  ग्रामीण रुग्णालय येथे 'एक तारीख, एक तास श्रमदान' हा उपक्रम राबविण्यात आला. आरोग्य विभाग, भारत सरकार यांनी निर्देशित केल्यानुसार या कालावधीत संपूर्ण देशामध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक तारीख, एक तास श्रमदान हा उपक्रम ग्रामीण रुग्णालयामध्ये राबविण्यात आला. रुग्णालयातील परिसर व रुग्णालया जवळील परिसराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. तसेच रुग्णालयातल्या प्रत्येक खोलीची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक साहेब मा. डॉ. सुभाष इंगळे, इन्चार्ज सिस्टर निता कोवे, डॉ. नागभीडकर सर, डॉ. अश्विन सर, डॉ. राजेश सर, डॉ. जवादे मॅडम, खामनकर सर, तावडे सर, कल्याणकर सर, रामटेके सर, जयश्री इंगोले, प्रणाली राऊत, कायसी साखरे, रेवती गोचडे, योगिता कुकुर्डे, प्रिती कुळसंगे ,भाग्यश्री सवाई, पूजा सौदे, नेहा मेंगेवार, माधुरी ब्राह्मणे, सुरेश लिहितकर, सागर चिंडाले, सुमित ब्राह्मणे, संतोष सारवान, रंजीत मडावी, अनंता पाचपोहर, राजकिरण राठोड, सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post