सह्याद्री चौफेर | अनंत पाचपोहर
मार्डी : मारेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहापळ ते पिसगांव कडे जाणाऱ्या रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यांवर प्रवास करताना येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
याबाबत अनेकदा तक्रारी, निवेदन मागणी करून सुद्धा संबंधित विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप ग्रा. पं सदस्य भैय्याजी कनाके यांनी केला आहे. एखाद्या वेळी इमर्जंसी रुग्ण असल्यास त्याला वेळेवर उपचार मिळाला नाही तर रुग्ण गतप्राण झाल्याशिवाय मार्ग नाही. तसेच येथील शिक्षण घेणाऱ्या शाळेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना सुद्धा वेळेवर पोहचता येत नाही. शिक्षक, बाहेरील कर्मचारी, तालुक्याच्या ठिकाणी जाणारे स्वयंसेवी, यांना देखील वेळे वर पोहचण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असते,असे त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.
तालुक्यातील अनेक गाव पेसा, निधीला काही कमी नाही. असं म्हटले जातं, परंतु पेसा अंतर्गत गावाचा विकास पाहता शून्य, असे कित्येक गावातील दयनीय अवस्था आहे. येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणाने दुरावस्था झाली असून गावात विविध समस्या भेडसावत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, सततच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे या मार्गांवरील खड्डे, पुल तुडुंब भरून असतात. वारंवार गावाचा संपर्क तुटतो, अशा परिस्थितीत एखादा एर्जन्सी रुग्ण दगावल्या शिवाय राहणार नाही असे, काहींशे विदारक स्थिती असल्यामुळे संबंधित विभागाने या पहापळ ते पिसगांव रस्त्याची तत्काळ पुनरबांधणी करण्यात यावी अशी मागणी आहे.