आज मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रम 17 ते 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत वणी विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज 22 सप्टेंबरला भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिर ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे सकाळी 10 ते दु.4 वाजेपर्यंत असणार आहे. शिबिरामध्ये रक्तातील साखर तपासणी (शुगर टेस्ट), रक्तदाब तपासणी (बि.पी.), हिमोग्लोबीन तपासणी, सिकलसेल तपासणी, गरोदर माता तपासणी, टि.बी., कुष्ठरोग तपासणी, लिवर, किडणी तपासणी, कॅन्सर, स्त्रीरोग, डेंगु, मलेरीया व इतर आरोग्य तपासणी होणार आहेत.

पुरुष, महिला, युवक-युवती व जेष्ठ इच्छूक नागरिकांनी या भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी यांनी केले आहे.
आज मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर आज मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर Reviewed by सह्याद्री चौफेर on September 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.