सह्याद्री चौफेर | अनंत पाचपोहर
मार्डी : तालुक्यातील किन्हाळा येथील श्रीमती कल्पना प्रभाकर भोयर (वय 48) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अशा अकाली निधनाने भोयर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीमती कल्पना भोयर ह्या अत्यंत मनमिळाऊ स्वभाच्या होत्या. परिसरात पूर्वी त्या होतकरू महिलांना आर्थिक बचतीबाबत निश्वार्थ भावनेने मार्गदर्शन करित असत. घरात शैक्षणिक वातावरण असल्यामुळे त्यांना सामाजिक कार्यात नेहमीच रुची असायची. त्यांच्यामागे एक मुलगा,एक मुलगी, जावई नातवंड असा परिवार आहे. विद्यमान सरपंच शुभम भोयर यांच्या त्या मातोश्री होत.
किन्हाळा येथील सरपंच शुभम भोयर यांना मातृशोक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2023
Rating:
