टॉप बातम्या

गावातील अवैध दारू विक्री बंद करा,शिवणी धोबे येथील नागरिकांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
       
मारेगाव : तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या शिवणी (धोबे) येथे अवैध दारू विक्री, सह मटका जुगार जोमात आहे. हा सर्व प्रकार ठाण्याला अवगत आहे, मात्र दुर्लक्ष होत असल्याची तक्रार घेऊन हा सर्व प्रकार तत्काळ थांबवण्यासाठी शिवणी येथील असंख्य महिला पुरुष आज मारेगाव पोलिस ठाण्यावर धडकले आहे. 
तालुक्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्यामुळे सुरु असलेले अवैधरित्या व्यवसाय तत्काळ बंद करा असे विद्यमान आमदार यांनी ठाणेदार खंडेराव यांना ताकीद दिली, दोन दिवसात सर्व अवैध धंदे बंद करण्यात येईल असे आश्वासन ठाणेदार यांनी साहेबांना दिल्यानंतर सुद्धा गावागावात अवैध दारू विक्री, मटका, जुगार सुरुच असल्याचे आता पुन्हा शिवणी येथील नागरिकांच्या तक्रारीने समोर आले आहे.
परिणामी, ग्रामीण तरुण नवयुवक या व्यसनाच्या आहारी जात असून घराघरात कौटुंबिक कलह निर्माण होत आहे. तसेच गावातील वातावरण कलूषित होऊन शांतता भंग होत असल्याची ओरड बहुतांश ग्रामीण नागरिकांची आहे. या अवैध प्रकाराला कंटाळून आज गुरुवारला शिवणी (धोबे) येथील महिला पुरुष तसेच जेष्ठ नागरींकांनी मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन सादर करून या अवैध दारू विक्री धारकांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली, याकडे दुर्लक्ष केल्यास येथील नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षकांचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती उपस्थिती नागरिकांनी दिली. 
Previous Post Next Post