देशातील विविध नामवंत कंपन्यात नौकरीची संधी, युवकांनी लाभ घ्यावा - पक्षनेते राजू उंबरकर


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मनसे दहीहंडी उत्सव दिनी पक्षनेते राजू उंबरकर यांनी युवकांसाठी मोठी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेचे स्वागत तथा वणी विधानसभा क्षेत्रातील युवक युवती मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आज त्यांची प्रतीक्षा संपली असल्याचे अधिकृत माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

आज मनसेच्या वतीने महाभव्य रोजगार मेळाव्याचा श्रीगणेशा तिर्थक्षेत्र भांदेवाडा येथे झाला आहे. आजपासून मनसेच्या रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे.

वणी शहरात तथा शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहे, त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रता असून देखील अपेक्षित क्षेत्रात स्थानिक युवकांना हाताला काम नसल्याने युवकांसाठी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळाव्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचा आज (ता.21) शुभारंभ विदर्भाचे आराध्य दैवत विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज तिर्थक्षेत्र, भांदेवाडा येथे नारळ फोडून श्रीगणेशा करण्यात आला.
यात देशातील पन्नास पेक्षा अधिक आयटी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ॲग्रिकलचर, फायनान्स कंपनी, बिफार्मा-नर्सिंग, डिलिव्हरी बॉय, सिक्युरिटी गार्ड, लॉजिस्टिक्स, एफएमसीजी, सेवा क्षेत्रातील नामवंत कंपन्या या रोजगार महोत्सवात सहभागी होणार आहे. त्यासाठी पाच हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार अशी माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दिले जाणार असून नोकरीत समाविष्ट करण्यात येणार आहे. या मेळाव्याअंतर्गत युवकांना ऑनलाइन ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने आपली नोंद करता येणार आहे. तसेच पक्षाने रजिस्ट्रेशन करिता क्यूआर (QR) कोड सुद्धा जारी केला आहे.

आज तीन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधला असून, या भव्य रोजगार मेळाव्याची संकल्पना, उद्देश आणि सविस्तर अशी अधिकृत माहिती दिली.

नोंदणीसाठी अधिकृत लिंक 👇
देशातील विविध नामवंत कंपन्यात नौकरीची संधी, युवकांनी लाभ घ्यावा - पक्षनेते राजू उंबरकर देशातील विविध नामवंत कंपन्यात नौकरीची संधी, युवकांनी लाभ घ्यावा - पक्षनेते राजू उंबरकर Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2023 Rating: 5
Powered by Blogger.