सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
तालुक्यातील अनुसया जहांगीर फुलझेले ही वृद्ध महिला आपल्या न्यायासाठी उपोषणाला तहसील कार्यालया समोर बसल्या होत्या. त्यांनी दिलेल्या निवेदनातून एकच मागणी होती की, गट नंबर 82 मधील फेरफार क्र.441 हा रद्द करुन फेरफार क्रमांक 401 हा कायम करावा. यासाठी तिचा सतत संघर्ष सुरु आहे. येथील उपोषणाचा सातवा दिवस लोटला परंतु वृद्धेचे उपोषण सुरूच होते, ही बाब उंबरकर यांना कळल्यानंतर त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सुचना देत सदर महिलेची काय समस्या आहे त्या जाणून घ्या आणि कळवा असे म्हणत जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, व शहराध्यक्ष चांद बहादे यांनी उपोषणमंडपी भेट दिली व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून त्या उपोषणस्थळी वृद्धेशी संवाद साधला, यावेळी मारेगाव तहसीलदार निलावाड यांनी सदर प्रकरण त्यांचे स्थानिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नसल्याने उपोषणकर्त्या अनुसया यांना सक्षम अधिकारी यांचे कडे सदर प्रकरणाबाबत अपील करावी. त्यानंतर आम्ही योग्य ते सहकार्य करू अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांचे आज बुधवारी (ता. 20) म्हणजे आठव्या दिवशी लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी मा.तहसीलदार उत्तम निलावाड, निवासी नायब तहसीलदार मडकाम मॅडम, नायब तहसीलदार मत्ते, प्रितम राजगडकर यांनी ज्यूस पाजून वृद्ध महिलेचे उपोषण सोडले. जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे, तालुकाध्यक्ष रुपेश भाऊ ढोके, शहराध्यक्ष चांद भाऊ बहादे, नगरसेवक अनिल भाऊ गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये उपोषणाची सांगता करण्यात आली.
अखेर मनसेच्या मध्यस्थीने वृद्ध महिलेचे आमरण उपोषण मागे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 21, 2023
Rating:
