सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : खरंच ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ म्हणतात ह्याचा प्रत्यय आज आलाय, शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कायर येथील गणेशोत्सवानिमित्ताने गस्त घालीत असताना 22 सप्टेंबर रोजी कायर येथे मळलेले व फाटके कपडे घातलेल्या अवस्थेत एक इसम निदर्शनास आला. शिरपूर येथे नव्याने पदभार स्वीकारलेले ठाणेदार संजय राठोड यांनी सदर इसमाची सहजच विचारपूस केली असता तो तेलगू भाषेत पुटपुटला,तो आजारी पण असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या अशा बोलण्यावरुण तो महाराष्ट्रीयन नसून हा इसम पर राज्यातील असल्याचा अंदाज ठाणेदार संजय राठोड यांनी लावत सीमालगत तेलंगणा राज्यातील मंचेराल पोलिसांसोबत संपर्क साधून सदर इसमाचे फोटो पाठवून माहिती दिली. मंचेराला पोलिसांनी सदरचा फोटो तेथील समाज माध्यमावर प्रसारित केले असता अवघ्या एका तासात सदर इसमाचे गावातील सरपंच यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, या व्यक्तीचे नाव मेहकला रमेश परमय्या वय 45 वर्ष रा. धर्मपुरम ता. धर्मसागर जिल्हा हनुमकोंडा तेलंगणा राज्य असे असून, तो 400 किलोमीटर अंतरावरील ठिकाणचा रहिवासी असुन, तो मागील दोन महिन्यापासून घरून बेपत्ता आहे. त्याचा आम्ही सर्वत्र शोध घेत होतो, परंतु तो त्याचा शोध लागला नाहीत. सदर इसमाचे नातेवाईकांना मी लगेच येथून रवाना करून ताब्यात घेण्याकरिता पाठवत आहोत असे सांगितले, तोपर्यंत त्याची काळजी घ्या! अशी विनंती केली. दरम्यान 'जनसेवा हिच ईश्वर सेवा' म्हणत शिरपूर पोलिसांनी त्या इसमाला प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे भरती करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन आज शनिवार दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी त्याचे नातेवाईक राजू दासरी गठया (मामा), भोलाबाईना हरीकिसन (मेव्हना) हे खाजगी वाहनाने कायर येथे दाखल झाले. त्यांची शिरपूर पोलिसांनी खात्री करून सदर इसमास त्यांच्या ताब्यात देऊन कर्तव्यांची प्रचिती दिली व खाकीत माणुसकीचे दर्शन घडून आले. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करित आभारही मानले. यावेळी ते म्हणाले की,'आम्ही मागील दोन महिन्यापासून याचा ठिकठिकाणी शोध घेत होतो, परंतु ते कुठेही आढळून आले नाही'. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा व मुलगी असे कुटुंब असून सर्व जण त्याच्या हरवल्यापासून शोधातच होते. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार संजय राठोड, पी एस आय रामेश्वर कांडुरे, बिट अंमलदार अनिल सुरपाम, अभिजीत कोशटवार, राजन इसनकर यांनी कर्तव्य पार पाडले. त्यांच्या कामगिरीने सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणेदार संजय राठोड यांच्या समयसुचकतेने मिळाले 'त्या' हरवलेल्या इसमाला घर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2023
Rating:
